Hindenburg अहवालामध्ये उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने या प्रकरणी SIT चौकशी फेटाळून लावली आहे. तर सेबीच्या नियामक चौकटीत कोर्टाला प्रवेश करता येणार नसल्याचंही म्हटलं आहे. 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणामध्ये सेबीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, गौतम अदानींना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) दिलासा मिळताच शेअर बाजारात मोठी तेजी आली आहे. अदानी समूहातील सर्व 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.  (हेही वाचा -Adani Hindenburg Case Verdict: उद्योगपती Gautam Adani यांना सुप्रिम कोर्टाचा मोठा दिलासा; SEBI चं करणार पूर्ण तपास)

अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर अदानी टोटल गॅस 10 टक्क्यांनी आणि एनडीटीव्ही शेअर्स 8 टक्क्यांनी वधारला आहे. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पॉवर या कंपन्यांचे समभाग 6 ते 7 टक्क्यांनी वधारले आहेत. त्याचप्रमाणे अदानी पोर्ट्समध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने 'Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History' या नावाचा रिसर्च रिपोर्ट जारी केला आहे. या अहवालात गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहावर टीका मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. 'जगातील सर्वात श्रीमंत असलेला तिसऱ्या क्रमांकाच व्यक्ती कॉर्पोरेट इतिहासातील कसा घोटाळा आहे.' असा हा अहवाल होता.