Hindenburg अहवालामध्ये उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने या प्रकरणी SIT चौकशी फेटाळून लावली आहे. तर सेबीच्या नियामक चौकटीत कोर्टाला प्रवेश करता येणार नसल्याचंही म्हटलं आहे. 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणामध्ये सेबीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. सेबीने या प्रकरणांमध्ये 22 आरोपांची चौकशी केली आहे. उर्वरित 2 आरोपांच्या चौकशींसाठी सेबीने 3 महिन्यांचा कालावधी मागितला आहे. सेबीने कोर्टात स्टेटस रिपोर्ट मांडल्यानंतर त्यावर सरन्यायाधीशांनी आपला निकाल 24 नोव्हेंबरला राखून ठेवला होता.
24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गनं गौतम अदानींच्या सर्व कंपन्यांबाबत अहवाल सादर केला होता. 'हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर, आम्ही केवळ जोरदार कमबॅक केलं नाही तर रेकॉर्डब्रेक निकाल देखील नोंदवले आणि आमचं सर्वात आव्हानात्मक वर्ष अभूतपूर्व ताकदीनं संपवलं आहे.' अशा भावना त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवल्या होत्या. Hindenburg Research New Report: हिंडेनबर्ग रिसर्च, लवकरच येत आहे नवा अहवाल! जगभरातील उद्योग समुहांच्या पोटात गोळा .
पहा ट्वीट
Adani-Hindenburg row: SC directs SEBI to complete probe within three months in remaining two cases
— Press Trust of India (@PTI_News) January 3, 2024
Hindenburg Research अहवाल कास सांगतो?
हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने 'Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History' या नावाचा रिसर्च रिपोर्ट जारी केला आहे. या अहवालात गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहावर टीका मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. 'जगातील सर्वात श्रीमंत असलेला तिसऱ्या क्रमांकाच व्यक्ती कॉर्पोरेट इतिहासातील कसा घोटाळा आहे.' असा हा अहवाल होता. त्यांनी अदानी समूह स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप केला. या अहवालात कंपनीने फसवणूक केल्याचा थेट आरोप केला आहे.