Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

Gang Rape in Jodhpur: कोलकाता येथे एका ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि नंतर हत्येप्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे. आता जोधपूरच्या (Jodhpur) सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. आई ओरडल्याने संतापलेली पीडित मुलगी रविवारी घरातून निघून गेली होती. यानंतर ती हॉस्पिटलमध्ये येऊन बसली. यावेळी अल्पवयीन मुलगी एकटी दिसल्यानंतर दोन तरुणांनी तिचे अपहरण करून, डम्पिंग यार्डमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. रविवारी सायंकाळपर्यंत मुलगी घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही.

पीडितेला डम्पिंग यार्डमध्येच टाकून आरोपी पळून गेले. त्यानंतर सोमवारी दुपारी पीडित मुलगी मोठ्या कष्टाने तिथून बाहेर [पडली व त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. पीडितेने सफाई कर्मचाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपींचा शोध सुरू केला.

प्रताप नगरचे एसीपी अनिल कुमार यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या डंपिंग यार्डच्या खोलीत अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. दोन्ही आरोपी तरुण सफाई कामगार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. तर यामध्ये सामील  तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने जोधपूरच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. रुग्णालयासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अशी घटना घडल्याने समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. (हेही वाचा: Mumbai Rape Case: मुंबईकर महिलेला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; मुंबई पोलिसांनी आरोपीच्या लुधियाना मधून आवळल्या मुसक्या)

अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया-

यावर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला. गेहलोत यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जोधपूरच्या महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना हे राजस्थानमध्ये जंगलराजच्या परिस्थितीचे आणखी एक उदाहरण आहे. जोधपूरमधील लोकप्रतिनिधी आणि पोलीस दोघेही कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे, त्यामुळे गुन्हेगारांना दिवसेंदिवस बळ मिळत आहे. शांतताप्रिय आणि गुन्हेगारीमुक्त जोधपूर भाजपच्या चुकीच्या कारभारामुळे उद्ध्वस्त झाले आहे.’