Fuel Prices Hike in India: भारतात पुन्हा इंधनदरवाढीचा भडका! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

Fuel Prices Hike in India: भारतात मागील एक-दोन दिवस स्थिरावलेले पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Prices) आज पुन्हा वाढले आहेत. आजच्या ताज्या अपडेट्सनुसार, दिल्लीत (Delhi) पेट्रोलचे दर 93.21 रुपये प्रति लीटर इतके झाले असून डिझेलचे दर 84.07 रुपये प्रति लीटर इतके आहे. तर मुंबईत (Mumbai) पेट्रोल 99.49 रुपये प्रति लीटर इतके असून डिझेल 91.30 रुपये इतके आहे. ही दरवाढ लक्षात घेता देशात पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडालेले चित्र पाहायला मिळत आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत लाक्षणिक वाढ झालेली पाहायला मिळाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. जर केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकले गेले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर 27 रुपये असेल, परंतु केंद्र किंवा राज्य सरकार दोघेही हा कर काढून टाकू शकत नाहीत. कारण कमाईचा मोठा भाग येथूनच येतो. या पैशातून विकास होतो.हेदेखील वाचा- Gas Cylinder Weight Complaint: घरी येणार्‍या गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये छेडछाड झाल्यास तक्रार कुठे कराल?

दररोज सकाळी किंमती निश्चित केल्या जातात

विदेशी विनिमय दराबरोबरचं आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दरही दररोज बदलत असतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेल दरात बदल करतात.

एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

आपण एसएमएसद्वारे दररोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील तपासू शकता. इंडियन ऑईल (आयओसी) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 वर पाठवू शकतात आणि एचपीसीएल ग्राहक (HPCL) <डीलर कोड> लिहून 9222201122 वर पाठवू शकतात. बीपीसीएल ग्राहक (BPCL) RSP <डीलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.