Fuel Price in India: मुंबई, दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल, डिझेल दर
Fuel Price Hike India | (File Image)

तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा इंधन दर (Fuel Price) जाहीर केले आहेत. दिलासादायक असे की, इंधन कंपन्यांनी दर जाहीर केले असले तरी या दरात कोणतीही कपात नाही. परंतू, त्यात वाढही नाही. त्यामुळे किमान आज (26 मे) तरी देशातील इंधन दर (Fuel Price in India) स्थिर राहणार आहेत. जाणून घ्या राजधानी दिल्ली, मुंबई यांसह देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल (Petrol), डिजेल (Diesel ) चे दर काय आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 93.44 रुपये तर डिझेल 84.32 रुपये दराने विकले जात आहे. मुंबई शहरात पेट्रोल प्रति लीटर 99.71 रुपये तर डिझेल 91.57 रुपये दराने विकले जात आहे.

देशातील प्रमुख शहरांतील आजचे दर (प्रतिलीटर प्रमाणे)

दिल्ली

  • पेट्रोल- 93.44 रुपये
  • डिझेल- 84.32 रुपये

मुंबई

  • पेट्रोल- 99.71 रुपये
  • डिझेल- 91.57 रुपये

कोलकाता

  • पेट्रोल- 93.49 रुपये
  • डीजल- 87.16 रुपये

चेन्नई

  • पेट्रोल- 95.06 रुपये
  • डीजल-89.11 रुपये

दरम्यान, इंधन कंपन्यांनी कालही (मंगळवार, 25 मे) इंधन दरात वाढ केली होती. ही वाढ पेट्रोल दरात प्रतिलीटर 23 पैसे तर डिझेल दरात प्रतिलीटर 25 पैसे इतकही होती. दरम्यान, सोमवारी (24 मे) मात्र इंधन दरात काहीही वाढ झाली नव्हती. त्यामुळे इधन दर स्थिर राहिले होते. त्या आधी रविवारी (23 मे) पेट्रोल, डिझेल दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. 23 मे दिवशी पेट्रोल प्रति लिटर 17 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 27 पैशांनी वाढले होते. (हेही वाचा, Petrol Diesel Price in Maharashtra: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरांनी ओलांडले शतक; कुठे 100 तर काही ठिकाणी 102 रुपये प्रतिलीटर दराने मिळतंय इंधन)

एएनआय ट्विट

पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढतात. परिणामी शेतीमाल, व्यावासायीक वाहतूक, हमाली, विक्री, कर, आणि एकूणच सर्व गोष्टींच्या दराची भरमसाठ वाढ होते. या सर्वांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकाच्या खिशावर पडतो. नागरिकांचे एकूण अर्थकारणच बदलून जाते.