कर्नाटक: माजी परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांचे जावई, CCD संस्थापक व्ही जी सिद्धार्थ बेपत्ता
Cafe Coffee Day founder VG Siddhartha (Photo Credits: Facebook)

देशाचे माजी परराष्ट्र मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा (SM Krishna यांचे जावई व्हीजी सिद्धार्थ (VG Siddhartha) हे बंगळुरु (Bengaluru) येथून बेपत्ता झाले आहेत. व्हीजी सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डे ( Cafe Coffee Day) चे संस्थापक आहेत. प्राप्त माहितीनुसार, नेत्रावती नदी परिसात ते शेवटचे दिसले होते. त्यानंतर त्यांचा शोध अद्याप लागला नाही. कर्नाटक पोलिसांकडून सिद्धार्थ यांच्या शोधार्त एक मोहीम सुरु आहे.

सीसीडी (CCD) संस्थापक व्हीजी सिद्धार्थ यांच्या बेपत्ता होण्याबाबत माहिती समजताच एसएम कृष्णा यांच्या बेगळुरु स्थित निवासस्थानी लोक एकत्र येऊ लागले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा आणि काँग्रेस नेते डीके शिवकुमार तसेच, बीएल शंकर हेसुद्धा एसएम कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

एएनआय ट्विट

सप्टेंबर 2017 मध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हीजी सिद्धार्थ यांच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. देशभरात सर्वाथी कॉफी बीन पुरवठा करणाऱ्या लोकांपैकी एक म्हणून व्हीजी सिद्धार्थ यांची ओळख आहे. (हेही वाचा, International Coffee Day 2018 : जाणून घ्या काय आहेत कॉफी पिण्याचे फायदे)

एएनआय ट्विट

माइंडट्री या संकेतस्थळावर असलेल्या त्यांच्या प्रोफाइल नुसार कॉफी बीन पुरवठा करणे हा सिद्धार्थ यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पारंपरीक व्यवसाय आहे. गेल्या 130 वर्षांहून अधिक काळ सिद्धार्थ यांचे कुटुंबीय कॉफीच्या व्यवसायात आहेत. माइंड ट्री मध्ये ते नॉन-एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहेत. व्हीजी सिद्धार्थ यांच्या अचानक बेपत्ता होण्याने कर्नाटकमध्ये अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. प्रकरणाची जनमानसातही प्रचंड चर्चा आहे.