कोरोना व्हायरसचं संकट देशामध्ये झपाट्याने पसरत असताना त्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 25 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र या काळात भाजीपाला, दूध, औषधं अशा जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी बाहेर न पडण्याचा सल्ला केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. या काळात ई कॉमर्स कंपन्यांनी त्यांची होम डिलव्हरीची सेवा बंद ठेवली होती. मात्र आता फ्लिपकार्टने त्यांची किराणा माल घरपोच देण्याची सुविधा पुन्हा सुरू केली आहे. दरम्यान राज्य सरकार, आणि स्थानिक यंत्रणा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर फ्लिपकार्ट आता पुन्हा नागरिकांना किराणामाल देण्यासाठी बाहेर पडू शकणार आहे.Conronavirus: लॉकडाउनच्या परिस्थितीत दुकानदार वस्तूंच्या अधिक किंमती वसूल करत असल्यास 'या' ठिकाणी करा तक्रार
अत्यावश्यक सेवांमध्ये किराणा माल, औषध यांची दुकानं लॉक डाऊनच्या काळामध्येही सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोबतच Flipkart Group चे CEO Kalyan Krishnamurthy यांनी देखील याबाबत माहिती दिलेली आहे. सध्या भारतामध्ये बिग बाजारकडून नागरिकांना घरपोच सोय दिली जात आहे. तर अमेझॉनला त्याबाबत परवानगी दिलेली नाही. Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर फ्लिपकार्टने बंद केल्या सर्व सर्विस, युजर्सला दिला 'हा' सल्ला.
Flipkart
We are grateful for the clarification provided by the government and local state authorities on the functioning of e-commerce during the lockdown. We are resuming our grocery services today.
India, we are committed to serving you at this time 🙏 Thank you for your trust
— Kalyan Krishnamurthy (@_Kalyan_K) March 25, 2020
सध्या नागरिकांमध्ये 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला तर? अशी भीती आहे. मात्र सरकारकडून सातत्याने जीवानावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही याची माहिती दिली जात आहे. देशामध्ये गरीबांसाठी आता मोफत अन्नधान्य पुरवण्याची सोय करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.