आईच्या प्रियकरने केलेल्या मारहाणीत 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
CRIME | (Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

पाच वर्षाच्या त्या मुलाला कल्पनाही नसेल आपण आईसोबत कुठे निघालोय? आपल्या भविष्याचे काय होणार? स्वत:च्या वर्तमानाचीच जाणीव नसलेला तो जीव आपल्या आईसोबत नव्या ठिकाणी राहायला आला. आईचा (Mother)या मुलाच्या वडिलांपेक्षा म्हणजेच तिच्या नवऱ्यापेक्षा प्रियकरावरच (Lover)अधिक जीव होता. त्यामुळे तिने नवऱ्यापासून वेगळे होत प्रियकरासोबत राहणे सुरु केले. पण, प्रियकर इतका विकृत निघाला की, त्याने आपल्या प्रेयसीच्या 5 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीवेळी खोलवर दुखापत झाल्याने मुलाचा मृत्यू झाला.

घटना आहे दिल्ली (Delhi) येथील कापसहेडा (Kapashera) पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या समालखा परिसरातील. घटना इतकी धक्कादायक आहे की, तिचा उलघडा होताच पोलीसही काही काळ सर्द झाले. पाच वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण झाल्याची पोलीसांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली. आरोपी व्यक्ती हा त्या मुलाच्या आईचा प्रियकर होता. पतीला सोडून गेले काही काळ ही महिला (आई) तिच्या प्रियकरासोबत (आरोपी) राहत होती. (हेही वाचा, विकृत नवऱ्याच्या सुखाची तृप्ती करण्यसाठी क्रूर आईने 4 महिन्यांच्या बाळाची 28 हाडे तोडली)

दरम्यान, आरोपीने या मुलाला एक दोन म्हणायला सांगितले. पण, त्याला एकदोन म्हणता आले नाही. त्यामुळे केवळ एकदोन येत नसल्याच्या कारणावरुन आरोपीने मुलाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यात त्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली. त्यानंतर पीडित मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 12 जानेवारीला उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.