Fitness Machine on Delhi Railway Station | (Photo Credit- Twitter)

दिल्लीच्या (Delhi) आनंद विहार (Anand Vihar) रेल्वे स्टेशन वर रेल्वे प्रशासनाने एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. या स्टेशनेटवर एक खास मशीन बसवण्यात आली आहे. या मशीनसमोर सीटअप्स केल्यास यातून फ्री प्लॅटफॉर्म तिकीट मिळेल. दिल्ली रेल्वे प्रशासनाने सुरु केलेल्या या अनोख्या प्रयोगाचे रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी देखील कौतुक केले आहे.

रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या फिटनेस मशीन समोर 180 सेकंदात 30 बैठका काढाव्या लागतील. या ठरलेल्या वेळेत तुम्ही 30 बैठका काढल्या तर तुम्हाला नक्कीच फ्री प्लॅटफॉर्म तिकीट मिळेल. अशाप्रकारची ही पहिलीच मशीन असून याद्वारे तुम्ही एक लहानशी बचत करु शकता. तसंच थोडासा व्यायाम देखील होईल. (Google Station प्रकल्प बंद; आता रेल्वे स्थानकांवर नाही मिळणार Free WiFi सेवा)

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात एक तरुण मशीन समोर बैठका काढून फ्री प्लॅटफॉर्म तिकीट घेताना दिसत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "फिटनेस सोबत बचत देखील. दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर फिटनेसला प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. येथे लावण्यात आलेल्या मशीन समोर व्यायाम केल्याने तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट फ्री मिळेल."

पियुष गोयल यांचे ट्विट:

 

सध्याच्या धावपळीच्या काळात फिटनेसकडे तितकेस लक्ष दिले जात नाही. त्यामुळे फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. मात्र याला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.