Economy | Representational image (Photo Credits: pxhere)

ग्लोबल रेटिंग एजन्नसी फिच रेटिंग्जने (Fitch Ratings) विद्यमान आर्थिक वर्ष 2022-23 (FY 2023) साठी भारताच्या आर्थिक वाढीचा ( Growth Rate of Indian Economy) अंदाज 7% असल्याचा अंदाज वर्तवला आहे. संस्थेने म्हटले आहे की, भारतीय यंदाच्या वर्षी इमर्जिंग मार्केटमध्ये बाजारातील सर्वात मोठी वाढ (ग्रोथ रेट) प्राप्त करणारा देश ठरु शकतो. दरम्यान, रेटींग एजन्सीने पुढच्या दोन वर्षांसाठी जीडीपी (GDP) वाढ घटेल अशी शक्यता वर्तवली आहे. सदर संस्थेने म्हटले आहे की, भारत जागतिक आर्थिक आव्हानांपासून सुरक्षीत राहण्यासाठी नक्कीच सक्षम राहिला आहे. परंतू, जागतीक घडामोडींपासून तो फार दूर असल्याचे दिसत नाही. दूर राहूही शकत नाही.

एकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डिसेंबरचा जीडीपी वृद्धी दर विद्यमान आर्थिक वर्षात ७% इतकी राहील. त्यानंतर मात्र 2023-24 मध्ये त्यात बऱ्याच प्रमाणावर शिथिलता राहील. या काळात हा दर 6.2% आणि 2024 मध्ये हा दर फारसा न बदलता 6.9 वर राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात फिचने विद्यमान आर्थिक वर्षात वाढीचा दर 7% तर पुढच्या आर्थिक वर्षा ७.1% इतका राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. फिचने पुढे असेही म्हटले आहे की, मजबूत आर्थव्यवस्थेत दिसत असलेला हा देश आगामी काळात जगभरातील अव्वल अर्थव्यवस्थांपैक एक ठरु शकतो. तसेच, भारत इमर्जिंग मार्केटमध्ये वेगाने वृद्धी दर प्राप्त करणारा देश ठरण्याची शक्यता आहे, असेही फीचने म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर केंद्रीत आहे.त देशाच्या डीडीपीमध्ये गुंतवणूक आणि विक्रीचा मोठा हातभार आहे. त्यामुळे जागतीक आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देश मोठ्या संकटांना तोंड देण्यात यशस्वी राहिला आहे, असेही फिच म्हणते.