Anji-Khad Bridge (Image Credit - Ashwini Vaishnav Twitter)

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) उत्तर रेल्वेच्या (Railway) उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (यूएसबीआरएल) विभागावर अंजी नदीवर भारतीय रेल्वे आपला पहिला केबल स्टील रेल पूल (cable stayed railway bridge) बांधत असून सध्या हा ब्रिज लवकरच पुर्ण होण्याची शक्यता आहे. मे मध्ये सुंदर पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या सुंदर ब्रिजचे व्हिडिओ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. हा पूल भारत सरकार एंटरप्राइझ कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारा बांधले जात आहे. हा पूल नदीच्या तळापासून ३३१ मीटर उंचीवर आहे. हा पुल जम्मू-काश्मीरमधील कटरा आणि रियासीला जोडेल. भव्य अंजी पूल हा भारतीय रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि बांधकाम प्रक्रियेत अडचणी व त्यातील तंत्रज्ञानामुळे हा अभियांत्रिकी चमत्कार मानले जात आहे.

अंजी पुल हा एका खांबावर असणार आहे, जो नदीच्या तळापासून 331 मीटर उंचीवर उभा आहे. अंजी पूल जोरदार वाऱ्याच्या जोरदार वादळाचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या स्थानाचे भूविज्ञान खूप गुंतागुंतीचे आहे, यामुळे कमानीवरील आधारित पुलाचे बांधकाम अशक्य आहे. शिवाय, 20 मीटर फाउंडेशनच्या परिघाभोवती 40 मीटर खोलीच्या मायक्रोफाइल्सचा आधार घेऊन खांबाचे बांधकाम एका उभ्या उतारामध्ये करावे लागले आहे. अंजी पुलाची एकूण लांबी 473.25 मीटर आहे. वायडक्टची लांबी 120 मीटर आहे आणि मध्यवर्ती तटबंदीची लांबी 94.25 मीटर आहे. यात 96 केबल सपोर्ट आहे.

यूएसबीआरएल प्रकल्पाचा एक भाग म्हणून, सपाट जमीन नसल्यामुळे भारतीय रेल्वे रेल्वे लाइन, पूल आणि बोगदे तयार करीत आहे. बांधकाम साहित्य आणि अवजड यंत्रसामग्रीच्या वाहतुकीसाठी बांधकाम साइट्सवर मोटार प्रवेश मिळविण्यासाठी हे जाळे देखील बनवित आहे. रेल्वेने जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते आणि 205 किलोमीटरचे रेल्वे रुळांचे जाळे तयार करत आहे.