Congress President Sonia Gandhi (Photo Credits: ANI)

काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या विरोधात एफआयआर (FIR) नोंदविण्यात आला आहे. कर्नाटक येथील शिवमोगा ( Shivamogga)  येथे हा एफआयआर दाखल झाल्याचे समजते. पीएम केअर (PM CARES Fund) फंडाबाबत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप करत एका व्यक्तिने तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, तक्रारदार हा स्वत: वकील आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचेही समजते.

सोनिया गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला FIR हा काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेल्या ट्विटबद्दल आहे. प्रवीण केवी नामक एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने 11 मे रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंत शिवमोगा पोलिसांनी FIR दाखल केला आहे. (हेही वाचा, पत्रकार अर्णब गोस्वामी विरूद्धच्या FIR रद्द करण्यासोबतच चौकशी CBI कडे हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)

एएनआआय ट्विट

दरम्यान, नेमके कोणत्या ट्विटवरुन ही तक्रार दाखल झाली आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, सोनिया गांधी यांच्याबाबत बोलायचे तर त्यांनी पीएम केअर्स फंडावरुन केंद्र सरकारवर अनेकदा निशाणा साधला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातूनही आपल्या भावना व्यक्त करताना सोनिया गांधी यांनी पीएम केअर्स फंडाबाबत टीका केली ओहती. हा व्हिडिओ स्थलांतरीत कामगारांच्या अडचणींवर भाष्य करणारा होता.