Chhattisgarh Encounter | Representative Image (Photo Credits: File Image)

Dantewada Encounter: छत्तीसगड (Chhattisgarh) मध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे, येथील दंतेवाडा जिल्ह्यात (Dantewada District) सोमवारी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक (Encounter) झाली. या चकमकीत, 25 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलवादीला ठार करण्यात आले. या महिला नक्षलवादीकडून एक इन्सास रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दंतेवाडाचे एसपी गौरव राय यांनी सांगितले की, अद्याप या ठिकाणी चकमक सुरू आहे.

दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अहवालानुसार, माओवादी महिलेचे नाव रेणुका उर्फ ​​बानू आहे. माओवादविरोधी कारवाईसाठी या भागात सुरक्षा दल पाठवण्यात आले होते. (हेही वाचा - Kathua Encounter: कठुआ चकमकीत 3 पोलिस कर्मचारी शहीद, 2 दहशतवादी ठार)

या कारवाईदरम्यान, सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून एक इन्सास रायफल, एका महिला माओवाद्याचा मृतदेह, दारूगोळा आणि दैनंदिन वापराच्या इतर वस्तू जप्त केल्या आहेत. परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे. (हेही वाचा -Kathua Encounter: कठुआमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसांच्या पथकावर गोळीबार)

दरम्यान, शनिवारी राज्याच्या बस्तर भागातील सुकमा आणि विजापूर जिल्ह्यात झालेल्या दोन चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी 18 नक्षलवाद्यांना ठार केले, ज्यात 11 महिलांचा समावेश होता. या महिला माओवादीवर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते असे सांगितले जात आहे.