भारतीय सैन्यात (Indian Army) जाण्याचा देशासाठी काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. अनेक भारतीय तरुण आपण सैन्यात दाखल होताना बघतो. पण महिलांचा सैन्यात दाखल होण्याचा कल मात्र कमीचं. पण देशासाठी कार्यरत होण्यास भक्त जिद्द आणि देशावर प्रेम हवं असतं. तुम्ही स्त्री असो वा पुरुष देशासाठी दोन्ही सारखेच. तर अशाचं काही इच्छूक महिलांना भारतीय सैन्य दलात रुजू होण्याची इच्छा असेल तर ती अग्निवीर (Agniveer) या भारत सरकारच्या नव्या सैन्य भरतीतून पूर्ण होवू शकते. आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस अंबाला (Army Recruitment Office Ambala) येथे 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान महिलांसाठी अग्निवीरांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अंबाला येथील खड्गा स्टेडियम येथे ही भरती होणार आहे. तरी अग्निवीर भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारा या भरतीस हजर राहून आपली नोंदणी करु शकतात.
शारीरिक फिटनेस चाचणी
अग्निवीर (Agniveer Recruitment) भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवाराची उंची 162 सेमी असणे अनिवार्य आहे. तर शारिरीक फिटनेस चाचणीत (Physical Fitness Test) उमेदवारास 1600 मीटर रनिंग, 10 फूट लांब उडी आणि 3 फूट उंच उडी मारावी लागणार आहे. यानंतर वैद्यकीय (Medical Test) आणि लेखी परीक्षा (Written Test) होईल. लेखी परीक्षेत निवड झालेल्या महिला उमेदवारांची (Female Candidate) भारतीय लष्करात (Indian Army) चार वर्षांसाठी नियुक्ती केली जाईल. (हे ही वाचा:- India Post Recruitment 2022: भारतीय टपाल विभागात 188 पदांसाठी भरती; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड)
या भरतीसाठी नोंदणी केलेले उमेदवार http://www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरुन आपलं एडमिट कार्ड डाउनलोड करु शकतात. भरतीसाठी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे हे एडमिट कार्ड असणे अनिवार्य आहे. अंबाला येथील खड्गा स्टेडियमवर 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान भरती मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यात अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर लिपिक कम स्टोअर कीपर, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर दहावी पास ट्रेडसमन, अग्निवीर आठवी पास ट्रेडसमन या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या महिला उमेदवार भरतीसाठी पात्र असतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.