मुंबई: मलबार हिल येथे लागलेल्या आगीतून 17-18 जणांची सुखरूप सुटका; 5 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Feb 05, 2020 11:25 PM IST
लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमूत्र यामुळे कोरोना व्हायरस बरा होत असल्याचा खोटा मेसेज डॉक्टरांच्या नावासह व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. त्यामुळे या खोट्या व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि हे मेसेज खोटे असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विदर्भातील हिंगणघाट येथील एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळणाऱ्या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. तर पीडित तरुणीच्या या अवस्थेबाबत राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली असून तिच्यावर योग्य उपचार करण्यात यावे असे निर्देशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच तरुणीच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीमधून करण्यात येणार आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
नवी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून आमदार गणेश नाईक यांच्या एकछत्री अंमलाला आव्हान देण्यात आले आहे. आता पर्यंत नवी मुंबई महापालिकेत नाईकशाहीचा विजय होत आला आहे.