'मदर्स डे' प्रमाणे वर्षातील एक दिवस असतो जो फक्त वडिलांसाठी साजरा केला जातो. जूनच्या प्रत्येक तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' (Fathers Day) जगभरात साजरा केला जातो. त्यामुळे सध्या यावर्षी हा दिवस 21 जून रोजी साजरा केला जाईल. 'मदर्स डे' प्रमाणेच, 'फादर्स डे'च्या सुरूवातीस चर्चमध्ये सहभाग होता जो शतकानुशतके ते संतांच्या सन्मानार्थ आयोजित केले जात होते. वडील प्रत्येक दिवशी आपल्या मुलांच्या आनंदासाठी, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत असतात. त्यामुळे त्यांना थँक्स करणं तर बनतच. आणि फादर्स डेच्या दिवशी वडिलांना खुश करण्यासाठी काहीतरी खास नक्की करा. पण, हा फादर्स डे नेमका कधी सुरु करण्यात आला. कोणकोणत्या देशांमध्ये तो साजरा केला जातो याविषयी तुम्हाला माहित आहे का? (Father's Day 2020 Gift Ideas: फादर्स डे दिवशी बाबांना खूष करण्यासाठी बनवू शकता या घरच्या घरी भेटवस्तू!)
यंदा 21 जून रोजी साजरा होणाऱ्या फादर्स डेची सुरुवात पहिले अमेरिकामध्ये झाली. अमेरिकामध्ये (America) 1993 मध्ये 'मदर्स डे' अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. मात्र, त्याच्या जवळपास 60 वर्षांनंतर म्हणजे 1972 मध्ये 'फादर्स डे' साजरा करण्याची सुरुवात झाली. अमेरिकामध्ये फादर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो, तर पोर्तुगाल, इटली आणि स्पेनमध्ये 19 मार्च रोजी सेंट जोसेफच्या वाढदिवसाच्या दिवशी फादर्स डे साजरा केला जातो. जिजसला माता मानणाऱ्या तिच्या नवऱ्याचा जन्मदिवस म्हणून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करतात. इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर जगातील जवळपास 70 देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला.
पितृत्व आणि पितृबंधनांचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात वडिलांचा प्रभाव दाखवण्यासाठी म्हणून हा दिवस ओळखला जातो. या दिवशी, वडिलांना भेटवस्तू, त्यांच्या आवडते पदार्थ बनवून एकत्र कुटुंबासोबत दिवस साजरा केला जातो. त्यामुळे आपल्या लाडक्या वडिलांसाठी नक्की काही ना काही प्लॅन करा आणि त्यांना खूश करा. दरम्यान, फादर्स डे बरोबर, जूनच्या तिसर्या रविवारीच्या एका आठवड्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय पुरुष आरोग्य सप्ताह देखील पुरुष आणि मुलांच्या आरोग्याच्या महत्त्वबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी साजरा केला जातो.