Farmers Protest: जो पर्यंत सरकार सोबत बातचीत होत नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही- राकेश टिकैत
शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत ( फोटो क्रेडिट- ANI)

Farmers Protest:  कृषी कायद्याच्या विरोधात अद्याप वाद सुरुच आहेत. शेतकऱ्यांकडून आंदोलन संपवले जाईल या बद्दल काही दिसून येत नाही आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती बदली गेली आहे. हिंसेबद्दल विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. हिंसेनंतर संगठनांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले आहे. काही लोकांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. याच दरम्यान गाजीपूर बॉर्डर मधील शेतकऱ्यांच्या युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी असे म्हटले की, जो पर्यंत सरकार सोबत बातचीत होत नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही.

राकेश टिकैत यांनी असे ही म्हटले की, सरकार सोबत बोलणे होत नाही तो पर्यंत धरणे आंदोलन कायम राहणार आहे. तसेच गावातील लोक ट्रॅक्टर मधून पाणी घेऊन येत नाही, पाणी पिणार नाही. प्रशासनाने पाणी हटवले, वीज कापली आणि सर्व सुविधा सुद्धा काढून घेतल्या. गाजियाबादचे डीएम यांनी धरणे आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना आज रात्री पर्यंत युपी गेट खाली करण्याचे अल्टीमेटम दिले आहे.(Anna Hazare Support Farmers: अण्णा हजारे देणार शेतकऱ्यांना पाठिंबा, 30 जानेवारी पासून बेमुदत उपोषणाची घोषणा)

Tweet:

दुसऱ्या बाजूला राकेश टिकैत आणि प्रशासनाच्या दरम्यान बातचीत फोल ठरली आहे. टिकैत यांनी भाजपवर आरोप लावत असे म्हटले की, त्यांची गुंडगिरी चालणार नाही. गाजीपूर बॉर्डवर प्रशासनाने सर्व सुविधा हटवण्यात आली आहे. ज्यावर शेतकऱ्यांचे नेते यांनी असे म्हटले की गाजियाबाद येथील पाणी सुद्धा पिणार नाही.