Anna Hazare Support Farmers: अण्णा हजारे देणार शेतकऱ्यांना पाठिंबा, 30 जानेवारी पासून बेमुदत उपोषणाची घोषणा
Anna Hazare | (Photo Credits: You Tube)

Anna Hazare Support Farmers: कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी 26 जानेवारील ट्रॅक्टर रॅली काढली होती. पण रॅली दरम्यान हिंसाचार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर बहुतांश जणांनी संताप सुद्धा व्यक्त केला. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात पोलिसांकडून एफआयआर दाखल केला गेला आहे. याच दरम्यान समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या 30 जानेवारी पासून बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.(Farmers Protest: शेतकरी आंदोलनात फूट; VM Singh, Bhanu संघटनेची आंदोलनातून तात्काळ माघार घेत असल्याची घोषणा)

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा देण्याचे याआधीच म्हटले होते. याच कारणास्तव अण्णांना भेटण्यासाठी भाजप नेते गिरीज महाजन गेले होते. त्यांनी अण्णांना उपोषण न करण्याचे आवाहन केले होते. परंतु आता अण्णांनी 30 जानेवारीला उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.(Farmers Protest Tractor Rally: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारात 86 पोलीस जखमी; 4 जणांवर गुन्हा दाखल)

Tweet:

दरम्यान अण्णांकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रात असे म्हटले की, शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता आंदोलन करणार आहे. तर येत्या 26 जानेवारीला दिल्लीत जी घटना झाली त्यामुळे मी दु:खी असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. मला नेहमीच शांतिपूर्ण आंदोलन हवे असल्याचे ही त्यांनी म्हटले.

दुसऱ्या बाजूला युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर गाझियाबाद मध्ये आंदोलक शेतकऱ्यांना आंदोलन करण्यात येणारी ठिकाण रिकामे करावेत असे आदेश डीएम यांनी दिले आहेत. 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्लीतील काही ठिकाणी हिंसाचार झाला. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन करु नये असे स्थानिकांचे म्हणणे आहे.