Farmers Protest: कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून अद्याप आंदोलन सुरुच आहे. शेतकऱ्यांकडून त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर केंद्र सरकारकडून यावर कोणताही तोडगा काढण्याबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही. याच दरम्यान, गुजरात दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी मोदी यांनी कृषी कायद्यावरुन एक मोठे विधान केले आहे. कच्छ मध्ये संबोधित करताना मोदी यांनी असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांना दिशाभूल केली जात आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करणार आहे.
पीएम मोदी यांनी पुढे असे ही म्हटले की, शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यांना घाबरवले जात असून नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनीवर दुसरेच जण आपले वर्चस्व गाजवणार आहेत. तर तुम्ही सांगा, एखादा डेरीवाला दूध घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यावेळी तो आपली गुरे घेऊन जातो का? मोदी यांनी असे म्हटले की, आज जे लोक विरोधात बसून शेतकऱ्यांना भ्रमित करत आहेत ते सुद्धा आपल्या वेळी या सुधारणेचे समर्थन करतात. त्यांनी शेतकऱ्यांना फक्त खोटी आश्वासन देतात. मात्र ज्यावेळी देशाने हे पाऊल उचलले तेव्हा आता शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.(Nitin Gadkari on Farmers Protest: शेतक-यांची दिशाभूल करुन त्यांच्या आंदोलनाचा दुरुपयोग करण्याचा काही घटकांचा प्रयत्न- नितीन गडकरी)
Tweet:
The agriculture reforms that have taken place are exactly what farmer bodies and even Opposition have been asking over the years. Government of India is always committed to farmer welfare & we will keep assuring the farmers and addressing their concerns: PM Narendra Modi in Kutch pic.twitter.com/CdzSqFq4NI
— ANI (@ANI) December 15, 2020
मोदी यांनी पुढे असे ही म्हटले की, धान्य आणि डाळीचे उत्पन्न घेणाऱ्या लहान शेतकऱ्यांनाा आपला माल विक्री करण्यासाठी आझादी का मिळाली नाही. कृषी सुधारक विधेयकाबद्दल खुप वर्षांपासून मागणी केली जात होती. अनेक शेतकऱ्यांच्या संघटनांनी याआधी सुद्धा मागणी केली होती की, धान्य कुठेही विक्री करण्यासाठी ऑप्शन दिला जावा.