Farm Laws Repeal: आंदोलनजीवी ते परजीवी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कृषी कायदे मागे घेण्यापर्यंतचा भाषण प्रवास (Video)
Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी अखेर केंद्र सरकारने संमत केलेले तनही कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची घोषणा केली. ही घोषणा करताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटले की, आम्ही केलेल्या कायद्याचे फायदे आम्ही शेतकऱ्यांना पटवून देऊ शकलो नाही. भारतीय जनता पक्षाला शेतकऱ्यांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे प्रधान सेवक म्हणून 2014 मध्ये माजी निवड झाली तेव्हापासूनच आम्ही शेतकऱ्यांच्या हितास आणि धोरणास प्राधान्य दिले आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ जोरदार चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या भाषणाचा आहे. ज्यात पंतप्रधान शेतकऱ्यांचा उल्लेख आंदोलनजीवी (Andolanjeevi), परजीवी (Parjivi) असा उल्लेख करताना दिसत आहेत.

शेतकरी आंदोलनावरुन संसदेत केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, देशात आता एक नवाच गट उदयास आला आहे. हा गट आंदोलनजीवी आहे. हे लोक देशात सुरु असलेल्या विविध आंदोलनात आपल्याला पाहायला मिळतील. हे लोक काही ना काही आंदोलन केल्याशिवाय जगूच शकत नाहीत. कोणतीही गोष्ट, घटना असली तरी ते त्यात निशेध करण्यासाठी कारणे शोधून काढत असतात. अशा आंदोलनजीविंपासून आपल्याला आपला देश वाचवायचा आहे. दरम्यान, राज्यसभेतही केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलकांना परजीवी म्हटले होते. (हेही वाचा, Farm Laws to be Repealed: 3 केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधनांची घोषणा; पहा Raju Shetti ते Nawab Malik यांची प्रतिक्रिया)

व्हिडिओ

व्हिडिओ

भाजपच्या काही लोकांनी तर शेतकरी आंदोलकांना खसिस्तानी आणि थेट माओवादीही ठरवले होते. शेतकऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन म्हणजे नियोजित षडयंत्र आहे, असेही म्हटले होते. दरम्यान, इतका दबाव, टीका होऊनही आंदोलक बधले नाहीत. त्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले. शेवटी शेतकरी आंदोलकांसमोर केंद्र सरकारला झुकावे लागले. त्यामुळे शेतकरी आंदोलकांचा विजय झाल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये निवडूण आल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारचा खऱ्या अर्थाने झालेला हा पहीला आणि मोठा पराभव असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.