देय जीएसटीची (GST) गणना करते वेळी कर कपातीची रक्कम वस्तूच्या किंमतीमधून कमी केल्याने आता महागड्या कार आणि दागिने स्वस्त होण्याची शक्यता आहे. याबद्दल केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीबीआयने म्हटले आहे.
प्राप्तिकर अधिनियमाअंतर्गत 10 लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतर असलेल्या कार आणि 5 लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेले दागिने त्याचसोबत चांदी-सोन्यासाठी दोन लाखापेक्षा अधिक किंमत असल्यास त्यावर कर वसुली 1 टक्क्याने आकारला जात होता. मात्र अन्य वस्तूंबाबत वेगवेगळ्या किंमतीच्या दराने कराची वसुली केली जाते. त्यामुळे आता देय वस्तू आणि जीएसटी गणना करते वेळी टीसीएसची रक्कम वस्तूंच्या किंमती मधून वेगळी केली जाणार आहे.(हेही वाचा-सोन्याचे भाव घसरले, ग्राहकांना दिलासा)
ज्या उत्पादनांवर कर वसुली लागू केली जाते त्यावर जीएसटीची गणना करताना टीसीएसच्या रक्कमेचा समावेश केला जातो. त्यामुळे सर्व गोष्टींबाबात विचार करुन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून सीबीआयने हा निर्णय घेतला आहे.