Advertisement संदर्भात सर्व ब्रॉडकास्टर्ससाठी केंद्राकडून मार्गदर्शक नियमावली जाहीर, Online Gaming आणि Fantasy Sports वर दिशाभूल करणाऱ्या जाहिरात न दाखवण्याची सूचना
Prakash Javdekar | Photo Credits: Twitter/ ANI

केंद्रीय माहिती व प्रसारण (Union Minister of Information and Broadcasting) मंत्री डॉ प्रकाश जावडेकर  (Prakash Javdekar) यांनी शनिवारी असे म्हटले आहे की, सरकारने ऑनलाईन गेमिंग आणि फँन्टेसी स्पोर्ट्सवर दिशाभूल करणाऱ्या जाहीराती दाखवू नये या संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचना सर्व चॅनल्स आणि रेडिओ स्टेशन सारख्या सर्व ब्रॉडकास्टर्ससाठी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग आणि फँन्टेसी गेमवरील जाहीराती या दिशाभूल करणाऱ्या नाहीत याबद्दल सुनिश्चित केले जाणार आहे. प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, सर्व प्रिंट आणि ब्रॉडकास्टिंग कंपन्यांना ऑनलाईन गेमिंग आणि फँन्टेसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मवर जाहीरातीसह एक डिस्क्लेमर ही दाखवावे अशी सुचना दिली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, ऑनलाईन गेम्स आणि त्यानंतर फँन्टेसी गेम्सवर प्रिंट जाहीरातींवर एक डिस्प्ले ठेवणे आवश्यक असणार आहे. हे खेळ खेळल्यास आर्थिक जोखीम होण्यासह त्याची लत लागू शकते. या व्यतिरिक्त या डिस्क्लेमरला जाहीरातीमध्ये 20 टक्के स्थान देणे आवश्यक असणार आहे. अशाच प्रकारे ऑडिओ विज्युअल आणि ऑडिओ जाहीरातींसाठी ही डिस्क्लेमर असावे. ऐवढेच नाही तर जाहीरात ज्या भाषेत आहे त्या भाषेतच डिस्क्लेमर असावे. ऑडिओ एका सामान्य आवाजात असावा.(FASTag ला आता Prepaid touch and Go Card चा पर्याय; NHAI ची 1 जानेवारीपासून नवी सुविधा)

माहिती व प्रसारण मंत्रालयाने एसएससीआय द्वारे जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक नियमात असे म्हटले आहे की, 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला ते पाहण्याची परवानगी नसणार आहे. त्याचसोबत कोणतीही गेमिंग जाहीरात 18 वर्षाखाली कोणालाही दाखवली जाऊ नये.

मंत्रालयाने आपल्या अॅडवायजरी मध्ये ऑनलाईन गेमिंग आणि फँन्टेसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मवर जाहीराती संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, केबल टेलिव्हिजन अधिनियम 1995 च्या कठोर नियम आणि विनयम आणि 2019 उपभोक्ता संरक्षण अध्यायानुसार आम्ही सर्व पत्रकारांना एक एडवाइजरी जारी करतो, ज्यामुळे हे निश्चित होते की ऑनलाइन गेमिंग आणि फॅन्टसी गेम्सवर जाहिरात भ्रामक नाही.