Eid ul-Fitr 2019 Greetings: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा!
PM Narendra Modi, President Ram Nath Kovind, CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

ईदचा चाँद दिसल्याने आज जगभरात ईद साजरी केली जाईल. देशातही ईदचा प्रचंड उत्साह आहे. मुस्लिम बांधवांसाठी खास असलेल्या या सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे. (रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, SMS, GIFs, Images, WhatsApp Status आणि मराठमोळी शुभेच्छापत्रं!)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "सर्व देशवासियांना विशेषत: देशातील आणि परदेशातील सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना ईद मुबारक. ईदचा हा सण चॅरिटी, बंधुत्व, करुणा यावरील तुमचा विश्वास दृढ करो. हा आनंदी सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणो."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ईद सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. "हा खास दिवस आपल्या समाजात सौम्यता, करुणा आणि शांतता जागृत करेल. प्रत्येकजण आनंदानी राहो," अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील शुभेच्छा देत म्हटले की, "ईद-उल-फित्र निमित्त ईद मुबारक आणि सर्वांना शुभेच्छा."

रमजान ईद या पवित्र सणानिमित्त एकमेकांबरोबर प्रेम, आनंद वाटा आणि ईदचा सण अगदी उत्साहात साजरा करा.