![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/04-8-380x214.jpg)
Happy Eid Mubarak 2019 Marathi Wishes: मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना सुरु आहे. या दिवशी शुल्क प्रतिपदेच्या चंद्रदर्शनाने रोजे सुरु होतात आणि शव्वाल या दहाव्या महिन्यातील चंद्रदर्शनाने ते पूर्ण होतात. चंद्रदर्शन झाले की त्याच्या दुसऱ्या दिवशी 'ईद-उल्-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जाते. फित्र हा शब्द दानाचे महत्त्व सूचित करतो. त्यामुळे ईद निमित्त धान्य, वस्त्र यांचे दान केले जाते. या दिवशी सर्व मुसलमान बांधव नवीन पोशाख परिधान करुन एकत्र जमतात. या भेटीच्या ठिकाणाला 'ईदगाह' असे म्हणतात. एकत्र नमाज पडून मग गळाभेट घेत एकमेकांना 'ईद मुबारक' अशा शुभेच्छा देतात.
या पवित्र आणि आनंदी दिनानिमित्त आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status आणि मराठमोळी शुभेच्छापत्रं...
धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची...
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमझान ईद ची
ईद मुबारक!
![01](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/01-7.jpg)
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा...
ईद मुबारक!
![02](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/02-9.jpg)
माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
रमजान ईद च्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा...
अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…
आमीन!
ईद मुबारक!
![03](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/03-8.jpg)
ईद मुबारक...
![04](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/04-9.jpg)
ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
ईद मुबारक!
![05](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/05-5.jpg)
GIFs
ईद निमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल असते. मात्र दुध, सुकामेवा आणि शेवया या पासून बनवलेल्या शीरखुर्माचे विशेष महत्त्व असते. गोडाधोडाच्या पक्वान्नासोबत लहान मुलांना खाऊ खाण्यासाठी पैसे दिले जातात. त्यास 'ईदी' असे म्हणतात.
तुम्हीही आपल्या मुस्लिम बांधवांसह ही शुभेच्छापत्रं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत त्यांचा आनंद द्विगुणित करा.