Eid al-Adha 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून बकरीद च्या शुभेच्छा; समाजात बंधुता वृद्धिंंगत करण्याच्या व्यक्त केल्या अपेक्षा
Prime Minister Narendra Modi and President Ramnath Kovind | (Photo credit: Archived, edited, representative images)

भारतामध्ये आज बकरीद (Bakrid) निमित्त कुर्बानी ईदचं पर्व साजरं केलं जात आहे. आज या Eid al-Adha च्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) , राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देताना हा दिवस समाजिक सख्य वाढवण्यासाठी प्रेरणा देणारा ठरावा अशी आशा व्यक्त करत बकरीद च्या निमित्ताने समाजात बंधुता आणि सहानुभतीची वाढ व्हावी अशा भावना व्यक्त बकरीद मुबारक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींसोबतच देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील भारतीयांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Happy Bakrid 2020 Messages: बकरीदच्या शुभेच्छा Wishes, Quotes, Greetings च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून साजरं करा कुर्बानी ईद चं पर्व

मुस्लिम बांधव बकरीद दिवशी मशिदीमध्ये नमाज अदा करतात. इस्लामिक मान्यतांनुसार, कुर्बानी देण्याची परंपरा पैगंबर हजरत इब्राहिम द्वारा सुरू झाली. या ईदला कुर्बानीचा सण देखील म्हटलं जातं. या सणाला देवाकडे तुमच्या सगळ्यात आवडत्या वस्तूची कुर्बानी देण्याची प्रथा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

ईद-उल-जुहा हा सण बंधुता आणि त्यागाच्या भावनाचं प्रतिक आहे. लोकांना सार्‍यांच्या हिताचं काम करण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे. त्यामुळे गरजवंतांपर्यंत मदत पोहचवा, आनंद द्विगुणित करा. सोबतच कोविड 19 ला रोखण्यासाठी सार्‍या सूचनांचे पालन करणं आवश्यक असल्याचं भान ठेवा.  अशा आशयाचंं ट्वीट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.

दरम्यान भारतामध्ये मध्ये आज सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बकरीद साजरी केली जात आहे. यामध्ये आज सकाळी दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये, फत्तेपुरी मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आली आहे. मुंबई मध्ये मात्र शांतपणे हा सण साजरा केला जात आहे. कुर्बानीसाठी नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र नमाज घरीच राहून अदा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.