ED Raid on Vivo: सुप्रसिध्द मोबाईल कंपनी वीवो सह 44 चायनिज कंपनीवर ED ची छापेमारी
Vivo (Photo Credits: Twitter)

ईडी (ED) कडून  चायनिज कंपन्यांवर (Chinese Company) मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुप्रसिध्द मोबाईल (Mobile) कंपनी वीवो (Vivo) सह 44 चायनिज कंपनीवर ED कडून छापे मारण्यात आले आहेत. बिहार (Bihar), झारखंड (Jharakhand), उत्तरप्रदेश (Uttar Pradesh), हिमाचल (Himachal Pradesh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), पंजाब (Panjab) आणि हरियाणा (Haryana) सारख्या विविध राज्यांमधील चाययनिज कंपनींवर ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात ईडी अॅक्शन मोड मध्ये असल्याचं बघायला मिळते. यापूर्वी महाराष्ट्रासह ईतर राज्यातही ईडीकडून विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. राजकारण्यापासून तर सिनेअभिनेत्यांपर्यत ईडी देशभरात कारवाई करताना दिसत आहे.

चायनिज कंपनीवर केलेली ही कारवाई विशेष आहे. कारण 2020 पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) स्वदेशीच्या नाऱ्यानंतर भारतीय बाजारपेढेत चायनिज वस्तूंना बरचं नुकसान सहन करावं लागलं. तर आता ही छापेमारी चायनिज कंपनींसाठी मोठी चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, इनकम टॅक्स (Income Tax) विभागाकडून देखील वीवो, ओपो (Oppo),वनप्लस (One Plus) यांसारख्या 20 हून अधिक चिनी कंपन्यांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच जम्मू आणि काश्मीरमधील चिनी कंपनीच्या वितरकांनी बनावट कागदपत्रे आणि खोटे पत्ते सादर केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. (हे ही वाचा:-CBSE Result रेंगाळला; सोशल मीडीयात मजेशीर मिम्स, Jokes वायरल)

तसेच यापूर्वी ED ने Xiaomi या चायनिज कंपनीची 5500 कोटी रुपयांची बँक मालमत्ता फ्रीझ केली होती. Xiaomi ने ED च्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती. बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल, मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणा सारख्या विविध राज्यांमधील चाययनिज कंपनींवर ईडी कडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे चायनिज कंपनीच्या विक्रीवर मोठा परिणाम होवू शकतो.