1 मे पासून 'या' आर्थिक गोष्टींत बदल होणार,जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits PTI)

येत्या 1 मे पासून काही आर्थिक नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. बदलण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बँक, रेल्वे, विमानसेवा यांच्या संबंधित आर्थिक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे सरकारी आणि बिगर सरकारी संस्थाच्या कार्यपद्धीत सुधारणा होण्यासाठी असे बदल करण्यात येतात.

पुढील महिन्यापासून आर्थिक नियम बदलणार असून त्याची माहिती तुम्हाला असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पाहूयात कोणत्या आर्थिक गोष्टीत बदल होणार आहे.(1 मे पासून बदलणार तिकिट आरक्षणासाठीचा 'हा' नियम, IRCTC च्या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती मिळवा)

-पीएनबी बँकेचे वॉलेट सेवा बंद

येत्या 1 मे पासून पीएनबी बँकेचे डिजिटल पद्धतीचे वॉलेट पीएनबी किट्टी बंद होणार आहे. तर बँकेने 30 एप्रिल पूर्वी वॉलेटमधील रक्कम खर्च करावे असे सांगितले होते. परंतु जर तुम्ही ही रक्कम अद्याप खर्च केली नसल्यात ती रक्कम आयएमपीएसच्या माध्यमातून खात्यात वळवावी असा सुद्धा पर्याय बँकेने ग्राहकांना दिला होता.

-एअर इंडिया विमानसेवा तिकिट

एअर इंडियाच्या विमानसेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट आरक्षित केल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये रद्द करु शकणार आहे. तर या रद्द केलेल्या तिकिटावर कोणातेही अतिरिक्त शुल्कसुद्धा आकारण्यात येणार नसल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे.

-घरगुती सिलिंडरच्या किंमती वाढणार

1 मे पासून घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यातसुद्धा घरगुती सिलिंडरच्या किंमती वाढल्या होत्या.

-स्टेट बँकेचे व्याजदर

स्टेट बँकेतील मुदत ठेवी आणि कर्जावरील व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कसोबत जोडण्यात येणार आहे. त्यामुळे बँकेकडून रेपोदरात होणाऱ्या बदलासह मुदत ठेवी आणि कर्जावरील व्याजदरात बदल होणार आहे.

-बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता बोर्डिंग स्टेशनमध्ये 24 तासाच्या अगोदर बदल करण्यात येणार आहे. मात्र ही सुविधा फक्त ऑनलाईनने तिकिट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठीच उपलब्ध होणार आहे.

तर वरील गोष्टी येत्या 1 मे पासून बदलणार असल्याचे सर्वांनी लक्षात ठेवावे. तसेच या गोष्टींची माहिती नसल्यास तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.