Earthquake. (Photo Credits: PTI)

आज दिवसभर महाराष्ट्रात (Maharashtra) निसर्ग चक्रीवादळाने (Cyclone Nisarga) थैमान घातले होते, मात्र सुदैवाने जास्त हानी न पोहोचवता हे वादळ मुंबईबाहेर पडले. आता मध्य व उत्तर महाराष्ट्रात पाउस सुरु आहे, अशात आज बुधवारी रात्री राजधानी दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या नोएडा (NCR) मध्ये भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल (Richter Scale) नोंदवली गेली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार बुधवारी रात्री 10.42 वाजता दक्षिण पूर्व नोएडा येथे हे भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या दीड महिन्यांत भूकंपामुळे दिल्ली आणि आसपासचा परिसर 11 वेळा हादरला आहे.

यापैकी बहुतेक भूकंप खूप कमी तीव्रतेचे होते, त्यामुळे त्यांचा धक्का फारसा जाणवला नाही. मात्र शुक्रवार 29 मे रोजी दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला, ज्यामुळे लोक घाबरले होते. त्या भूकंपाचे केंद्र हरियाणातील रोहतक असून रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.5 होती.

जाणून घ्या गेल्या दीड महिन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये आलेले भूकंप-

  • 12 एप्रिल - 3.5 - दिल्ली
  • 13 एप्रिल - 2.7 - दिल्ली
  • 16 एप्रिल - 2.0 - दिल्ली
  • 03 मे - 3.0 - दिल्ली
  • 06 मे - 2.3 - फरीदाबाद
  • 10 मे - 3.4 - दिल्ली
  • 15 मे - 2.2 - दिल्ली
  • मे 28 - 2.5 - फरीदाबाद
  • 29 मे - 4.5 - रोहतक
  • 29 मे - 2.9 – रोहतक

(हेही वाचा: शरद पवार यांचा हा Video पाहिलात का? किल्लारी भूकंप 1993 घटनेवेळी केलेले अपत्ती व्यवस्थापन कौशल्य पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा)

दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, यावेळच्या भूकंपाचे केंद्र नोएडाच्या दक्षिणेस पूर्वेस 19 किमी अंतरावर रोहतक हे होते. हा भूकंप झाल्यामुळे लोक रात्री उशिरा घराबाहेर आले होते. नोएडाच्या बर्‍याच भागागोंधळ उडाला होता, मात्र भूकंप फार तीव्र नव्हता, म्हणून कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.