Dussehra 2020: दसरा सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा!
President Ramnath Kovind, PM Modi & Rahul Gandhi (Photo Credits: IANS)

नवरात्र उत्सवाची सांगता आज दसऱ्याच्या सणाने होत आहे. सर्वत्र दसऱ्याचा आनंद, उत्साह पाहायला मिळत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या सावटाखाली दसऱ्याचा सण देशभरात साजरा होणार आहे. तरी देखील सणाचा आनंद कमी झालेला नाही. दरम्यान, सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Union Minister Prakash Javadekar), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. (Dussehra 2020: उपमुख्यमंत्री अजित पवार, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेला दिल्या दस-याच्या शुभेच्छा)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ट्विट:

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट:

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ट्विट:

राहुल गांधी ट्विटः

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ट्विटः

दरम्यान, आज सिक्कीम मधील नाथुला येथे संरक्षण मंत्री भारतीय जवानांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर दसऱ्यानिमित्त होणाऱ्या शस्त्रपूजनातही सहभागी होणार आहेत. सणाच्या उत्साहात कोविड-19 च्या संकटाचा विसर पडू देऊ नका. विशेष खबरदारी घेत सणाचा आनंद लुटा. तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठीकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!