आज सर्वत्र विजयादशमी उत्सव (Vijayadashmi) साजरा केला जात आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे त्रासून गेलेल्या जनतेसाठी आजचा हा सण नवी उमेद, नवीन उत्साह घेऊन येणारा आहे. त्यामुळे दसरा (Dussehra) सणाच्या जनतेला शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट केले आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचे वर्ष म्हणावे तसे चांगले नव्हते. मात्र अशा परिस्थितीत जनतेने दाखवलेल्या हिंमतीचे कौतुक करत या दिग्गजांनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दसऱ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी असे म्हणत दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा करूया असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. Happy Dussehra 2020 Wishes In Marathi: दस-याच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन उत्साहात साजरी करा यंदाची विजयादशमी!
दसऱ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी, अशा शुभेच्छा! दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा करूया!#Dussehra pic.twitter.com/ByY5gBtulR
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 25, 2020
त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील सर्वांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
#विजयादशमी #दसरा pic.twitter.com/byju7fiqpi
— Raj Thackeray (@RajThackeray) October 25, 2020
विजायदशमीला शस्त्रांची पूजा होते. कोरोना महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हीच कोरोनाशी लढण्यासाठी आपली महत्त्वाची अस्त्रे आहेत. त्यांच्या वापर करूया आणि कोरोनारूपी शत्रूवर विजय मिळवूया.आपण सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
विजायदशमीला शस्त्रांची पूजा होते. कोरोना महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हीच कोरोनाशी लढण्यासाठी आपली महत्त्वाची अस्त्रे आहेत. त्यांच्या वापर करूया आणि कोरोनारूपी शत्रूवर विजय मिळवूया.
आपण सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!#Dasara2020 pic.twitter.com/HhZiHcEDEf
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 25, 2020
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील ही विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुखशांती, समाधान व संपन्नता घेवून येवो असे सांगत सर्वांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. ही विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुखशांती, समाधान व संपन्नता घेवून येवो. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
— Governor of Maharashtra (@maha_governor) October 25, 2020
आज सर्वत्र दस-याचा उत्साह पाहायला मिळत आहे. यात लोक आपट्याची पाने देऊन एकमेकांना दस-याच्या शुभेच्छा देतात. त्याचबरोबर या दिवशी शस्त्रांची, विद्येची देवता मानल्या जाणा-या सरस्वतीची आणि पुस्तकांची पूजा केली जाते. या मंगलमयी सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!