प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

प्रत्येक धर्मामध्ये लग्नाचे (Marriage) एक ठराविक महत्व असते. काही धर्मामध्ये तर हे सात जन्माचे बंधन मानले आहे. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना वाटत असते की आपल्या घरी लग्न करून येणारी, सून बनून येणारी मुलगी ही सर्वगुणसंपन्न असावी. मात्र सध्या बदलती जीवनशैली, बदलता काळ, बदलती मानसिकता यांमुळे स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने चालत आहेत. हीच गोष्ट अनेकांना खटकत आहे. अशा लोकांना खुश ठेवण्यासाठी आता चक्क ‘दुल्हन कोर्स’ (Dulhan Course) सुरु झाले आहेत.

मुलीला एका उत्तम सून बनवण्यासाठी काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. प्रत्येक मुलीमध्ये हे गुण उपजतच असतात असे नाही. म्हणून हैद्राबादमधील (Hyderabad) एका संस्थेने अशा प्रकारचे शिक्षण देणे सुरु केले आहे. यासाठी खास एक 'फॅमिली इंस्टीट्यूट' (Family Institute) सुरु केले गेले आहे. इथेच मुलींना सर्वगुणसंपन्न सून बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. थोडक्यात सफल वैवाहिक जीवनाची कला इथे शिकवली जाते.

महत्वाचे म्हणजे या कोर्ससोबतच ‘लग्नानंतर घर कसे सांभाळावे’ तसेच ‘योग्य आई कसे बनावे’ अशा प्रकारचे कोर्सेसही इथे चालू आहेत. या कोर्सची एक जाहिरात सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हे कोर्सेस आणि ती जाहिरात पाहून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. लग्नानंतर घर संभाळने, सर्वांना खुश ठेवणे ही जबाबदारी फक्त मुलीची नाही. अशा प्रकारचे कोर्सेस पुरुषांसाठीही सुरु करायला हवेत असे लोकांचे म्हणणे आहे. (हेही वाचा:  “लग्नानंतर सेक्सपेक्षाही जास्त महत्वाच्या आहेत या 5 गोष्टी” is locked लग्नानंतर सेक्सपेक्षाही जास्त महत्वाच्या आहेत या 5 गोष्टी)

या इंस्टीट्यूटमध्ये कुटुंबव्यवस्थेशी निगडीत अनेक गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. यामध्ये जेवण बनवणे, शिवणकाम, भरतकाम, ब्युटी टिप्स, पैशांची बचत अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. गेली दोन वर्षांपासून हे इंस्टीट्यूट चालू आहे, इथे या सर्व गोष्टींसाठी महिना 5 हजार रु, फी आकारली जाते.