American Airlines Pee-Gate: New York-Delhi विमानात मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर लघुशंकेची अजून घटना; आरोपी विद्यार्थी
Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

न्यूयॉर्क-दिल्ली विमानामध्ये (New York-Delhi Flight) अजून एका प्रवाशाने आपल्या सहप्रवाशावर मूत्रविसर्जन (Urinates) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना AA292 मधील आहे. हे विमान शुक्रवारी रात्री 9 वाजून 16 मिनिटांनी न्यूयॉर्क (New York) वरून दिल्ली (Dellhi) कडे झेपावलं होतं. शनिवारी रात्री 10 वाजून 12 मिनिटांनी ते दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅन्ड झालं आहे. आयजीआय एअरपोर्ट दिल्ली च्या डीसीपीच्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाईन्स (American Airlines) मध्ये आर्य वोहरा नामक तरूणावर सहप्रवाशावर मूत्र विसर्जन केल्याची तक्रार मिळाल्याने गुन्हा दाखल केला आहे. आर्य हा अमेरिकेत शिकतो तर दिल्लीच्या डिफेंस कॉलनी मधील रहिवासी आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, आरोपी विद्यार्थी नशेत होता. त्याअवस्थेमध्ये त्याने विमानात मूत्रविसर्जन केले ज्यामुळे त्याच्या शेजारी बसलेला व्यक्ती देखील ओला झाला. दरम्यान या घटनेनंतर त्या मुलाने सहप्रवाशाची माफी मागितली आहे. आणि सहप्रवाशानेही आपलं नाव उघड न करण्याचं तसेच आपण तक्रारही न करणार असल्याचं म्हटलं आहे. मुलाने माफी मागितली आहे आणि त्याच्या करियरवर पुढे परिणाम होऊ नये म्हणून तक्रार करत नसल्याचं म्हटलं आहे. मात्र एअरलाईन कडून हा प्रकार गांभिर्याने घेतला जात आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर ATC ला देण्यात आली. त्यांच्याकडून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोपीला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नक्की वाचा: Air India: लघुशंका प्रकरणानंतर एअर इंडियाकडून प्रवास नियमांत मोठे बदल, प्रवासादरम्यान मद्यपानाविषयी विशेष नियमावली .

नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, जर एखादा प्रवासी गैर वर्तनासाठी दोषी आढळला तर त्याला विशिष्ट कालावधीसाठी उड्डाण करण्यास बंदी घातली जाऊ शकते. मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर लघवी केल्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये अशीच एक घटना घडलीहोती. ज्यामध्ये शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत बिझनेस क्लास मध्ये एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप आहे.