उत्तर प्रदेश: भर मंडपात जेवण वाढण्यावरुन वाद, वराकडून वधूच्या 9 वर्षी भावाची हत्या,  तिघांच्या अंगावर एसयूव्ही घातली
Murder | (Photo Credits: PixaBay)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील फारुखाबाद (Farrukhabad) येथे भर मांडपात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाह मंडपात जेवण वाढण्यावरुन निर्माण झालेला वाद पराकोटीला गेला. त्यातून नवरदेव असलेल्या तरुणाने नवरीच्या 9 वर्षीय भावाची म्हणजेच मेहुण्याची हत्या केली. नवरदेवाची क्रुरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने वधुकडील वऱ्हाडी असलेल्या दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलगी अशा तिघांच्या अंगावर एसयुव्ही घालण्याचा प्रयत्न केला. यात त्या तिघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. नवरदेव मनोज कुमार आणि त्याच्या मित्रांनी सोमवारी रात्री शमशाबाद परिसरात विवाहाच्या ठिकाणी वाटल्या जाणाऱ्या मिठाईवरुन वधुकडील नातेवाईकांशी भांडण सुरु केले. ज्यात ही घटना घडली.

नवरीचा भाऊ पुनीत याने सांगितले की, ते जेव्हा वऱ्हाडींशी भांडण करत होते तेव्हा ते नशेत धुंद होते. दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठांनी यात हस्तक्षेप केला. मात्र, त्यांनी माझ्या मामावर गोळीबार केला. त्यांचे प्राण थडक्यात वाचले. पुनीत याने आरोप केला आहे की, त्याचा छोटा भाऊ प्रांशु हा पाहुण्यांना पाणी देत होता. दरम्यान, आरोपींनी एसयुव्हीमध्ये घातले आणि घेऊन गेले. दुसऱ्याच दिवशी 3 वाजता त्यांनी माझ्या भावाचा मृतदेह गवात फेकला आणि पळून गेले.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, प्रांशु याच्या शरीरावर गळा दाबल्याच्या खुणा आढळल्या. त्याच्या चेहऱ्यावरही खुणा होत्या. दरम्यान, एसयूवी अंगावर घातल्यामुळे जखमी झालेल्या विमला (50), मिथिलेश (35) आ सपना (17) फार्रुखाबाद येथी लोहिया जिल्हा रुग्णालयाात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.