अयोद्धेमध्ये भगवान श्री रामांच्या मंदिर (Ram Mandir) उभारणीच्या कामाला जोरात सुरूवात झाली आहे. या मंदिराच्या निर्माणासाठी देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र अशातच वृत्तसंस्थांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेद्वारा (VHP) वर्गणीच्या स्वरूपात गोळ्या केलेल्या 22 कोटी रूपयांचे सुमारे 15 हजार चेक बाऊंस झाले आहेत. मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकार द्वारा न्यास 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र'च्या एका ऑडिट रिपोर्ट मध्ये चेक बाऊंस (Bank Cheques Bounce) झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
दरम्यान चेकच्या रक्कमेपेक्षा खात्यामध्ये पैसे कमी असल्याचं तसेच काही तांत्रिक गोंधळ असल्याचं कारण देत हे चेक बाऊंस झाले आहेत. न्यासाचे सदस्य ऑ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक घोळांबाबत बॅंक अधिक तपास करत आहे पण त्यांनी लोकांना पुन्हा दान देण्याचेही आवाहन केले आहे. या चेक मध्ये सुमारे 2000 चेक हे अयोद्धेमधूनच गोळा करण्यात आले आहेत.
विश्व जिंदू परिषदेने 15 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान वर्गणी गोळा करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारा चेक गोळा करण्यात आले आहेत. या अभियानात सुमारे 5000 कोटी रक्कम गोळा झाली आहे. अद्याप न्यास कडून मंदिरासाठी वर्गणी म्हणून आलेल्या रक्कमेचा एकूण आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. Ayodhya Ram Mandir: अयोध्यामधील राम मंदिर परिसर आता 70 नव्हे, तर 107 एकर चा असणार; ट्रस्टने खरेदी केली आणखी जमीन.
मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले. त्यानंतर खोदकाम, जमिन सपाटीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. मंदिराचे मॉडेलही जारी करत कामाला मोठ्या आनंदात सुरूवात झाली आहे.