दिवाळी (Diwali) सण मोठा नाही आनंदाला तोटा, असे म्हणतात कारण खरोखरच दिवाळी हा सण आनंदाचा सण असतो. हिंदी परंपरेत दिवाळी सणाला अत्यंत महत्त्व आहे. लहानांपासून थोरांपर्यंत आणि गरीबापासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो. दिवाळी सणाला लोक दीपावली (Deepavali) असेही म्हणतात. दिवाळी सणाला लोक मोठ्या उत्साहात असतात. घरासमोर आकाशकंदील, दारात रांगोळी आणि नवे कपडे घालून लोक एकत्र येतात. आनंद, उत्कर्षाबद्दल बोलतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. गेल्या वर्षीची दिवाळी कोरोनामुंळे काहीशी लॉकडाऊनमध्येच गेली. यंदा मात्र, कोरोना कहर काहीसा कमी आल्याने लोक दिवाळीचा आनंद घेतील. दरम्यान, दिवाळीनिमित्त एकमेकांना डीजिटल शुभेच्छा देण्यासाठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages आम्ही येथे देत आहोत. जे मोफत डाऊनलोड करुन आपण वापरु शकता.
हिंदु पंचागानुसार दिवाळी हा सण आश्विन किंवा कार्तिक महिन्यात येतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार हाच सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. या सणानिमित्त भारतात सर्वसाधारण सर्वांनाच काही काळ सुट्टी असते. हा सण प्रामुख्याने सहा दिवस चालतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे ते सहा दिवस. या सणाला संपूर्ण भारतात जवळपास सर्वच ठिकाणी सुटी असते. हा एक पवित्र हिंदु सण मानला जातो. जो वाईटावर चांगल्या विचारांच्या विजयाचे प्रतिक आहे.
दिवाळी या सणाला दीपावली असे म्हटले जाते. मात्र, प्रदेशानुसार या सणाचा उल्लेख आणि त्याचा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. या शब्दाची उत्पती "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ" या दोन संस्कृत शब्दांपासून झाली आहे. त्यामुळे दिपवाळी असाही या सणाचा मूळ उल्लेख असल्याचे जाणकार सांगतात. काही लोक दीपावली या शब्दाचा उच्चार प्रदेशानुसार आणि भाषेनुसार वेगवेगळा करतात.