Toolkit Case Update: टूलकिट प्रकरणातील दिशा रवी ची दिल्लीच्या तिहार तुरुंगातून सुटका
दिशा रवि (Photo Credits-Twitter)

टूलकिट प्रकरणात (Toolkit Case) 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेल्या दिशा रवीची (Disha Ravi) आज दिल्लीच्या तिहार तुरुंगातून (Tihar Jail) अखेर सुटका झाली आहे. आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणीदरम्यान दिशा रवी हिची पोलीस कोठडीचा कालावधी संपण्याआधी तिचा जामीन मंजूर झाला होता. त्यानुसार तिची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. दिशा हिला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल टीमकडून 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने तिला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दिशाची न्यायालयीन कोठडी संपण्यासाठी एक दिवस बाकी होता. मात्र त्याआधीच दिशाच्या वकिलांमुळे तिचा जामीन पटियाला हाऊस कोर्टाने मंजूर केला आहे.हेदेखील वाचा- Toolkit Case: दिशा रवि हिला पटियाला हाउस कोर्टाकडून मोठा दिलासा, टूलकिट प्रकरणी न्यायलयाने दिला जामीन

दिल्ली कोर्टाकडून दिशा हिला एक-एक लाखांच्या दंडानंतर जामीन दिला गेला आहे. दरम्यान, दिशा हिच्याबद्दल कोर्टात पार पडत असलेल्या सुनावणीचा दिल्ली पोलिसांनी जोरदार विरोध केला. परंतु कोर्टाने दिशा रवि हिच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर तिचा जामीन अर्ज स्विकारला.