गोव्यात (Goa) लवकरच मोठी उलाढाल पाहायला मिळणार आहे. तर मायकल लोबो (Michael Lobo) यांच्या मते काँग्रसेचे दिग्गज नेता आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat )भाजप (BJP) सोबत हातमिळवणी करणार असल्याची शक्यता आहे.एएनआयने (ANI) दिलेल्या वृत्तानुसार लोबो यांनी असे म्हटले की, शनिवारी भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी दिगंबर कामत यांना भाजप मध्ये घ्यायचे का मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच कामत यांच्याकडे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे पद सांभाळायला द्यायचे का याबद्दलसुद्धा बोलणे झाले आहे.
दिगंबर कामत रविवारी दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. 2005 मध्ये भाजप सोडून काँग्रेस पक्षात सामिल झाले होते. त्यावेळी भाजप पक्षात त्यांना दुसऱ्या क्रमांकाचा मान दिला जात होता. 2007 ते 2012 पर्यंत गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळणारे कामत आता दिल्लीला गेले आहेत.(हेही वाचा-गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावली; गोव्यात राजकीय घडामोडींना वेग)
ANI ट्वीट:
Goa Deputy Speaker Michael Lobo to ANI: Last evening, at BJP MLAs meeting, a discussion was held over Digambar Kamat joining BJP. The decision on whether he will be the CM will be taken by central leadership. (File pic-Goa Deputy Speaker Michael Lobo) pic.twitter.com/tCrBK7L7Us
— ANI (@ANI) March 17, 2019
तर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली जात आहे. त्यामुळे भाजप पक्षाकडून गोव्यातील राजकीय परिवर्तनाबद्दल विचार करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अफवांवर विश्वास न ठेवता भाजपने गोव्यातील सरकार सुरळीत सुरु असल्याचे सांगितले होते.