
Dhanteras 2022: दरवर्षी कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा तो 22 आणि 23 ऑक्टोबर असे दोन दिवस साजरा केला जाणार आहे. पण ज्योतिषांनी लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी 22 ऑक्टोबर ही सर्वात योग्य तारीख सांगितली आहे. तसेच हा दिवस खरेदीसाठी देखील शुभ मानला जातो.
धनत्रयोदशीच्या दिवशी भाविकांना सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदी करण्याची प्रथा आहे. अशा काही गोष्टी ज्योतिष शास्त्रातही सांगण्यात आल्या आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी अशुभ वस्तू खरेदी केल्याने आर्थिक संकटे येतात आणि भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीचा कोप होतो. (हेही वाचा - Dhanteras 2022 Shopping Timing: देशभरात आज धनत्रयोदशी उत्साहात साजरी; सोन्या-चांदीची भांडी खरेदीसाठी शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी जाणून घ्या)
धनत्रयोदशीला या गोष्टी खरेदी करू नका -
काळ्या वस्तू: धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी काळी वस्तू घरी आणणे अशुभ मानले जाते.
काचेची वस्तू:
वास्तुशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काचेची वास्तू घरी आणल्याने घरातील सदस्यांवर अशुभ प्रभाव पडतो. कारण काच हे राहू ग्रहाचे प्रतीक मानले जाते.
तेल खरेदी करू नका:
धनत्रयोदशीच्या दिवशी तेल किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ जसे की तूप किंवा रिफाइंड इत्यादी खरेदी करणे माणसासाठी हानिकारक ठरू शकते. धनत्रयोदशीपूर्वीचं दीपदानासाठी तेल खरेदी करा.
रिकामी भांडी:
धनत्रयोदशीच्या दिवशी रिकामी भांडी घरी आणल्याने आर्थिक स्थिती धोक्यात येते आणि ते अशुभ मानले जाते. त्यामुळे भांडे खरेदी केल्यानंतर अर्धा किलो तांदूळ किंवा साखर खरेदी करून त्या भांड्यात ठेवा.
प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू:
हिंदू धर्मात प्लास्टिकला अशुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी यापासून बनवलेल्या वस्तू घरी आणल्याने वास्तूवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे देवी लक्ष्मी कोपते.
कार:
धनत्रयोदशीच्या दिवशी गाडी खरेदी करू नये असे अनेक ज्योतिषी मानतात. कारण ते बनवण्यासाठी अनेक धातू वापरले जातात. जे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यास मनाई आहे. त्यामुळे तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर धनत्रयोदशीच्या आधी पैसे द्या.
डिसक्लेमर - या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती वितरीत करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. याव्यतिरिक्त, वापरकर्ता स्वत: त्याच्या कोणत्याही वापरासाठी जबाबदार असेल.