Delhi: पतीसोबतचे भांडण पोहचले शिगेला, संतप्त पत्नीकडून पोटच्या मुलाची हत्या
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Delhi: दिल्लीतील फतेहपुर परिसरात 11 महिन्याच्या मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली त्याचा आईला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी असा दावा केला आहे की, तिचे नवऱ्यासोबत भांडण सारखे व्हायचे. 9 जुलै रोजी मुलाला ताप आला होता. नवऱ्याने डॉक्टरकडे जाण्यासाठी नकार दिला. त्यानंतर महिला संतप्त होत तिने आपला मुलगा चुन्नी याची गळा दाबून हत्या केली.(अयोध्येत मोठी दुर्घटना! सरयू नदीत बुडाले एकाच घरातील 12 जण, बचाव कार्य सुरु)

खरंतर तेरा गावातील पोलिसांना कळले की, एका वडिलांनी मुलाची हत्या केली. पण दुसऱ्या फोनवेळी असे कळले आईने मुलाला मारले. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी पाहिले की, 11 महिन्याच्या मुलाचा मृतदेह पलंगावर तसाच पडला होता. त्याला गळ्याला ओढणी बांधून त्याची हत्या केली गेली होती. शेजारच्या माणसांनी मुलाला तातडीने रुग्णालयात नेले पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी तपास सुरु केला असता तेव्हा मुलाच्या आई-वडिलांनी एकमेकांवर आरोप लावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी टेक्निकल सर्विलांस, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खरे समोर आले. तेव्हा मुलाची आई ज्योती हिनेच त्याची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी ज्योती हिला अटक केली आहे.(Chhattisgarh: धक्कादायक! वडिलांचा 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल) 

आरोपी ज्योती हिने पोलिसांना सांगितले की, तिचे लग्न 2011 रोजी झाले होते. तिचा नवरा तिला पसंद करत नसे आणि दोघांमध्ये सातत्याने भांडण व्हायचे. तर 9 जुलै रोजी सुद्धा नवऱ्यासोबत जोरदार भांडण झाले. तिने म्हटले की, मुलाची तब्येत बिघडली होती. नवऱ्याला मुलाला डॉक्टरकडे नेण्यास सांगितले. पण त्याने त्यासाठी नकार दिला. याच कारणामुळे संतापत 11 महिन्याचा मुलाची हत्या केल्याचे ज्योती हिने कबुल केले आहे. ज्योती ही गुरुग्राम येथे राहणारी आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.