Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Ayodhya: उत्तर प्रदेशातील अयोध्येत एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध गुप्तार घाटाजवळ असलेल्या सरयू नदीत (Sarayu River) स्नान करण्यासाठी उतरलेल्या 12 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत लोक हे एकाच परिवारातील असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आगरा येथून चार परिवारातील 15 लोक अयोध्येत फिरण्यासाठी आले होते. गुप्तार घाटात सर्वजण आले असता तेथील नदीत अंघोळ करण्यासाठी उतरल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांचा बचाव करण्यात आले. यानंतर बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. यामध्ये रेक्यू टीमने आणखी दोन मुलींचा वाचवले आहे. आता पर्यंत 10 जणांचा तपास सुरु आहे. रेस्कू ऑपरेशनचे नेतृत्व एसएसपी शैलेश पांडे यांच्याकडून केले जात आहे. तर नदीत पाय घसरल्यानंतर सरयूमध्ये 12 जण खोल बुडाले.

लोक बुडाल्याची घटना तातडीने पोलिसांना दिली गेली. त्यानंतर स्थानिक पोलीस गोताखोर यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य पार पाडत आहेत. त्याचसोबत स्थानिक अधिकाऱ्यांची टीम सुद्धा घटनास्थळी पोहचली. गुप्तार घाटात स्नान करत होते. तर कच्च्या किनाऱ्याजवळ हे सर्वजण अंघोळ करताना ही दुर्घटना घडली आहे. असे सांगितले जात आहे की, आगरा येथील सिकंदरा मधील हे सर्व स्थानिक आहेत.(Chhattisgarh: धक्कादायक! छत्तीसगड येथे वीज कोसळल्याने 4 मुलांचा दुर्देवी मृत्यू)

परिवारातील एक व्यक्ती सतीश याने म्हटले की, चार परिवार दोन गाड्यांमधून आगरा येथे आले होते. या लोकांनी मंदिरात दर्शन केले आणि त्यानंतर घाटावर बसले होते. पावसामुळे घसरण निर्माण झाली होती. यामुळे एकएक करुन सर्वजण बुडाले. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गुप्तार घाटातील दुर्घनेबद्दल कळले असता सर्व वरिष्ठांसह ते घटनास्थळी दाखल झाले. लोकांना लवकरात लवकर रेस्कू करावे असे निर्देशन दिले आहे.