Chhattisgarh: धक्कादायक! छत्तीसगड येथे वीज कोसळल्याने 4 मुलांचा दुर्देवी मृत्यू
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) जशपूर (Jashpur) जिल्ह्यात अंगावर वीज कोसळल्याने (Lightning Strikes) चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नारायणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोली गावात राहणारे पहाड तोली गावात राजकुमारी (वय, 4 वर्ष), अनुज (वय, 5 वर्ष), सुंदरी (वय, 4 वर्ष) आणि आकाश (वय, 7 वर्ष) हे चौघजण घराकडून शेताकडे जात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जशपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. खेळायला गेलेले मुले उशीरापर्यंत घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

मृत मुले खेळायला गेले असताना या परिसरात कडक विजांसह मुसळधार पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, शेताजवळील धरण परिसरात पोहचल्यानंर त्यांना राजकुमारी आणि अनुज हे मृत अवस्थेत आढळले. तर, सुंदरी आणि आकाश हे दोघेही बेपत्ता होते. त्यानंतर ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांनी याबाबात कळवले. या घटनेची माहिती होताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहचले आणि बेपत्ता मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. हे देखील वाचा- Telangana: सेल्फी घेणे जीवावर बेतले! एकाच कुटुंबियांतील 3 मुलींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू

त्यानंतर आज सकाळी धरणातून सुंदरी आणि आकाश या दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अंगावर वीज कोसळल्याने या मुलांचा मृत्यू झाला आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.