Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मध्य दिल्ली (Delhi Accident) येथील पहाडगंज (Paharganj News) परिसरात एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने (Underage Driving) चालवलेल्या कारने दोन वर्षांच्या मुलीला चिरडले. ज्यामध्ये या मुलीचा जागीच मृत्यू (Toddler Death) झाला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा अपघात रविवारी संध्याकाळी 6.15 वाजणेच्या सुमारास मुलगी रस्त्यावर खेळत असताना घडला. भिषण सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी खेळण्यात मग्न असल्याचे दिसून येते. त्याच वेळी पाठिमागून एक काळी हुंडई व्हेन्यू (Hyundai Venue Accident) येताना दिसते. ही चारचाकी गाडी या चिमुकलीला आपल्या चाकांखाली चिरडते. ज्यामुळे चिमुकली गंभीर जखमी होते. तिच्या बचावासाठी लोक घटनास्थळी धावले आणि त्यांनी तिस रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

अल्पवयीन कारचालक पोलिसांच्या तब्यात

पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, प्राथमिक तपासानुसार, मुलीच्या मृत्यूस कारण ठरलेल्या अल्पवयीन कार चालकास ताब्यात घेतले आहे. ही कार पीडित मुलीच्या कुटुंबातील शेजारी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांची होती. अपघातावेळी 15 वर्षीय मुलगा स्वत: गाडी चालवत होता. या घटनेनंतर पोलिसांनी किशोर चालक आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले, जो गाडीचा नोंदणीकृत मालक आहे. भारतीय न्याय संहिताच्या कलम 281 (अविचारीपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवणे) आणि106 (1) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Delhi Hit And Run: दिल्लीत भरधाव कारने पोलिसला चिरडले, कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू)

अल्पवयीनांच्या वाहन हाकण्यावरुन चिंता

या दुःखद अपघातामुळे भारतात अल्पवयीन वाहन चालवण्याबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कडक कायदे असूनही, अनेक अल्पवयीन मुले बेकायदेशीरपणे गाडी चालवत राहतात, ज्यामुळे प्राणघातक अपघात होतात. गेल्या वर्षी पुण्यात एका अल्पवयीन मुलाने पोर्श वेगाने गाडी चालवल्याने दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. निष्काळजीपणामुळे आणखी एक जीव गेल्याने, तज्ञ अधिकाऱ्यांना वाहतूक कायदे काटेकोरपणे लागू करण्याची आणि अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्याची परवानगी देणाऱ्या पालकांना जबाबदार धरण्याची विनंती करत आहेत.