Delhi Hit And Run: दिल्लीत भरधाव कारने पोलिसला चिरडले, कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू

दिल्लीतील नांगलोई भागात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना, एका पोलिस कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दारू पुरवठा करणाऱ्या एका भरधाव कारने पोलिसाला चिरडले आहे.

Delhi Hit And Run: दिल्लीत भरधाव कारने पोलिसला चिरडले, कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू
Photo Credit- X

Delhi Hit And Run: दिल्लीतील नांगलोई भागात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना, एका पोलिस कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दारू पुरवठा करणाऱ्या एका भरधाव कारने पोलिसाला चिरडले आहे. कारने पोलिसाला १० मीटरपर्यंत ओढत नेले आणि तेवढ्यात दुसऱ्या कारची धडक लागली. या  भीषण अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्री उशीरा घडली. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून परार झाला असून पोलिसांनी कार जप्त केली आहे.  (हेही वाचा-  पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी दाखल केला पुरवणी अंतिम अहवाल; अल्पवयीन आरोपींविरुद्ध पुरावे नष्ट करणे, बनावटगिरी आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल)

दिल्ली पोलिसाचा अपघाती मृत्यू

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2024 10:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).