दिल्ली: TikTok स्टार आत्महत्या करण्यासाठी 18 तास हॉटेलच्या छतावर, 50 लाख युजर्स करतात फॉलो
Tik Tok (Photo Credits-Gettey Images)

सध्या सोशल मीडियात गाण्यांचे व्हिडिओ बनवण्यासाठी विविध अॅप युजर्ससाठी उपलब्ध आहेत. त्यामधील एक टिक टॉकचे (Tik Tok) जगभरात लाखो युजर्स असून ते व्हिडिओच्या माध्यमातून आपली कला दुसऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र टिक टॉकच्या माध्यमातून यापूर्वी अश्लील व्हिडिओ सुद्धा समोर आले होते. त्यामुळे टिक टॉक संबंधित काही नियमात बदल करण्यात आले. मात्र आता दिल्ली येथील एका टिक टॉक स्टारने हॉटेलच्या छतावर 18 तास चढून उभा राहत आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. तसेच या टिक टॉक स्टारने आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला होता. त्याने पोस्ट केलेला व्हिडिओ प्रचंड वेगाने सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

संदीप उर्फ अरमान मलिक असे टिक टॉक स्टारचे नाव आहे. तसेच अरमान हा टिक टॉकवर प्रसिद्ध असून त्याचे आजवर 50 लाख फॉलोअर्स आहेत. अरमान याने आत्महत्या करण्यासाठी धमकी देत तीन व्हिडिओ टिक टॉकवर पोस्ट केले. त्यामधील एका व्हिडिओत मलिक याने असे म्हटले आहे की, माझी बायको पायल आणि तिच्या घरातील सदस्यांनी मिळून माझ्यावर बलात्काराचा आरोप लगावत गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत घरातील मोलकरणी आणि नीरज नावाच्या व्यक्तीचा सुद्धा अरमान याने व्हिडिओत उल्लेख केला आहे.

आत्महत्या कारण्यामागील अरमान याने पायल याच्या दोन बहिणी यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पायलच्या दोन बहिणी मला बदनाम करत असून त्यांनी माझ्यावर बलात्काराचा आरोप लगावला असल्याचे स्पष्टीकरण अरमान याने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पायल ही अरमान याची पहिली बायको असून आत्महत्या करण्यासाठी ज्या हॉटेलच्या छतावर चढला होता तेथेच त्याचे दुसरे लग्न झाले होते.(मोहित मोर, Tik Tok स्टारची दिल्ली मध्ये गोळ्या झाडून निर्घुण हत्या)

पोलिसांच्या मते, अरमान त्याच्या बायकोसोबत एका हॉटेलमध्ये आला होता. मात्र दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद झाल्याने अरमान हॉटेलच्या छताच्या दिशेने गेला. अरमान याच्या या प्रकारानंतर सोमवारी सकाळी त्याला हॉटेलच्या छतावरुन खाली उतरवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.