Delhi Rape Case | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) बलात्कार प्रकरणात एका आरोपीला निर्दोश मुक्त केले आहे. न्यायालयाने आरोपीला निर्दोश मुक्त करताना सांगितले की, ज्या दिवशी आरोपीने पीडित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्या दिवशी आरोपी हा त्या महिलेचा पती होता. त्यामुळे या शरीरसंबंधास बलात्कार (Rape) म्हणता येणार नाही. या महिलेने आरोपीसोबत विवाह केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश उम्मेद सिंह ग्रेवाल यांनी म्हटले की, महिलेने 5 जुलै 2016 या दिवशी कथीत बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. परंतू, ही घटना बलात्काराचे प्रकरण म्हणता येणार नाही. कारण 'त्या दिवशी ती आरोपीची पत्नी होती'.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात आरोपीची निर्दोश मुक्तता केली. न्यायालयाने निर्णय देताना म्हटले की, 'हे स्पष्ट आहे की, पीडितेने आरोपीसोबत 02 नोव्हेंबर 2015 किंवा त्याही आधी विवाह केला. पीडितेने स्वत:च दिलेल्य माहितीनुसार, आरोपीने 5 जुलै 2016 या दिवशी तिच्यावर बलात्कार केला. परंतू, ही घटना घडली त्या दिवशी ही महिला आरोपीची पत्नी होती. (हेही वाचा, गुजरात: लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सला नकार दिल्याने नवऱ्याकडून बायकोला मारहाण)

तक्रारकर्ती महिला ही आरोपी व्यक्तीसोबत पंजाब येथे राहात होती. दरम्यान, तिला कळले की ज्या व्यक्तीसोबत आपण पत्नी राहात आहोत त्या व्यक्तीला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात तो दोषीही ठरल्याने त्याची रवानगी कारागृहातही करण्यात आली होती. पतीबाबत ही माहिती कळल्याने तिने कोणालाही न सांगता पतीचे घर सोडले आणि ती दिल्लीला आली. दरम्यान, या महिलेपाठोपाठ तिचा पतीही दिल्लीला आला. त्याने पत्नीला विश्सासात घेऊन सांगितले की, यापुढे तो असे कोणतेही काम करणार नाही. त्यानंतर दोघेही सोबत राहू लागले. (हेही वाचा, धक्कादायक! Sex ला नकार देणाऱ्या पत्नीची हत्या करून पतीने स्वतःचेच गुप्तांग कापले, पोलिसांकडे दिली कबुली)

दरम्यान, या व्यक्तीने या महिलेचे दोन लाख रुपये चोरले. या घटनेनंतर महिलेने या व्यक्तीसोबत राहण्यास नकार दिला. महिलेने या व्यक्ती म्हणजेच तिच्या पतीविरुद्ध चोरीची तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केले. महिलेने त्याच्यावर पुन्हा आरोप केला की, त्यानंतरही आरोपी तिच्या घरी येत असे व जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत असे. या आरोपावर कोर्टाने सांगितले की, पंजाब आणि दिल्ली येथे राहताना दोघांनीही परस्परसंमतीने शरीरसंबंधास प्रस्थापित केले. यावर महिलेने आरोप केला की त्याने दोन लाख रुपये चोरी केल्यानंतरही जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. यावर न्यायालयाने म्हटले की, 'आरोपीने जेव्हा पीडितेसोबत शरीरसंबंध ठेवले तेव्हा तो तिचा पती होता आणि ती पत्नी. त्यामुळे या बाबतीत हे बलात्काराचे प्रकरण होऊ शकत नाही.' या प्रकरणात न्यायालयाने आरोपीची निर्दोश मुक्तता केली.