'ताज महाल'ची भेट प्रियकराला पडली महागात, तुरुंगात झाली रवानगी
ताज महाल (फोटो सौजन्य- Pixabay)

प्रेमाच्या बाबतीत लोक काय उद्योग करतील याचा नेम नाही. तर प्रेमात आंधळ्या झालेल्या युगलुकांना कोणत्याही प्रकराचे भय न वाटता खुलेआम प्रेमाचा स्वीकार करताना पाहायला दिसून येतात. मात्र प्रेम आंधळ असते अशी एक म्हण आहे. जर योग्य वेळी याबबात काही निर्णय न घेतल्यास ते महागात पडू शकते. अशाच पद्धतीचा किस्सा दिल्ली येथे घडला आहे.

दिल्ली (Delhi) मध्ये राहणाऱ्या मुलाला त्याच्या घराबाजूला राहणारी मुलगी फार आवडत होती. त्यामुळे तो या मुलीला लग्नाची मागणी घालणार होता. तसेच अचानकपणे त्या मुलीला लग्नाची मागणी कशी घालावी यासाठी त्याने सरप्राईज देण्याचे ठरविले. सरप्राईज देण्यासाठी मुलाने चक्क प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताज महालाची प्रतिकृती साकारली. या मुलाने साकारलेल्या ताज महालाचे गिफ्ट मुलीला देण्याची वेळी आली तेव्हा त्याने गिफ्टपॅक असलेला बॉक्स मुलीच्या घराच्या गच्चीवर फेकला. मात्र झाले असे की, तो गिफ्टचा बॉक्स मुलीला न मिळता चक्क होणाऱ्या सासऱ्यांच्या डोक्यावर जाऊन आदळला.(हेही वाचा-ठाणे: प्रियकराच्या मदतीने बायकोने केली पतीची हत्या, मृतदेह हॉस्पीटलमध्ये नेऊन रचला अपघाताचा बनाव)

या प्रकरणी अचानकपणे गच्चीवर गिफ्ट बॉक्स कोणी फेकला यावरुन वाद सुरु झाला. तसेच मुलीच्या वडिलांनी ती ताज महालाची प्रतिकृती घेऊन पोलिसात पोहले. त्यावेळी काही महिन्यांपासून एक मुलगा पाठलाग करत असल्याचे मुलीने सांगतिले. तर ताज महालाची प्रतिकृती स्विकारावा अशी गळ मुलाकडून घातली जात होती. गिफ्ट नाकारले तर त्याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकी या मुलाकडून देण्यात येत असल्याने त्याची आता तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.