दिल्ली सिग्नेचर ब्रीज ( फोटो सौजन्य - ट्विटर )

Delhi Signature Bridge : दिल्लीच्या सिग्नेचर ब्रीजवर गेल्या 24 तासांत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच शुक्रवारी दोन मुलांच्या सेल्फी काढण्याच्या उद्योगामुळे त्यांचा याच ठिकाणी मृत्यू झाला.

गाझियाबाद मधील शंकर आणि त्याचा मित्र दीपक अशी या दोघांची नावे आहेत. तसेच सिग्नेचर ब्रीजवरुन जाताना त्यांची दुचाकी घसरुन हा भीषण अपघात झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहचून या प्रकरणाची दखल घेतली. तर शंकरचा मृत्यू झाला असून दीपक गंभीर जखमी झाला आहे.

शुक्रवारी दोन मुलांनी या सिग्नेचर ब्रीजवर सेल्फी काढण्याचा पराक्रम केला. त्यामुळे ब्रीजवरुन खाली कोसळून या दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी या ब्रीजचा लोकार्पण सोहळा नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल, उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते पार पडला होता.