Delhi Crime News: राजधानी दिल्ली यथील पांडवनगर (Pandav Nagar) परिसरातील शशी गार्ड येथे अल्पवयीन बहीण आणि भावाच्या हत्येमुळे (Dead Bodies of Two Minors) खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या अल्पवयीन मुलांच्या आईवरही प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्लाचा आणि हत्येचा संशय पीडितेचा पती म्हणजेच मृतांच्या वडीलांवर आहे. धक्कादयक म्हणजे संशयीत आरोपी असलेला पीडित महिलेच्या पतीचा मृतदेह आनंद विहार रेल्वे रुळांवर आढळून आला. मृतांपैकी शिनाख्त कार्तिक 15 वर्षांचा तर आस्था 9 वर्षांची आहे. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेली मुलांचीआई शन्नू चौरासिया (वय-40) यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
हत्या आणि हल्ला केल्यावर घराला कुलूप?
पोलिसांनी प्राथमिक तपासात संशय व्यक्त करत म्हटले आहे की, पीडित महिलेचा पती श्यामजी चौरासिया याने पहिल्यांदा मुलांची गळा दाबून हत्या केली असावी. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्यानंतर घराला बाहेरुन कुलुप लाऊन तो पसार झाला असावा. पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळांवर पडलेला असल्याची माहिती शुक्रवारी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा मृतदेह श्यामची यांचा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना संशय आहे की, मुलांची हत्या आणि पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्याने आत्महत्या केली असावी.
बापच सूत्रधार?
दरम्यान, हत्येनंतर कार्तिक आणि आस्था या मुलांचे वडील श्यामजी चौरासिया बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांना संशय आहे की, श्यामजी हाच खरा सूत्रधार असून त्यानेच मुलांची हत्या करुन आणि पत्नीला गंभीर जखमी करुन नंतर आत्महत्या केली असावी. दोन्ही मुलांचा गळा दाबून तर पत्नीवर जाड वस्तूने प्रहार करुन तिला गंभीर जखमी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तिघांचीही हत्या झाल्याचे समजून आरोपीने घराबाहेर पळ काढत आत्महत्या केली असावी असा संशय आहे.
दरम्यान, आनंद विहार रेल्वे स्थानकाजवळ श्याम सिंह यांचा निर्जीव मृतदेह सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले. मृतदेहाची ओळख पटवताना हा मृतेदेह श्याम चौरासिया याचाच असल्याची पुष्टी त्याच्या भावाने केली. दरम्यान, सन्नूला तातडीने लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.