Delhi Rain

सध्या देशाच्या काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. विशेषत: उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) - गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद - च्या अनेक भागांमध्ये शनिवारी सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हवामानातील उष्णतेमुळे झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. रीजनल वेदर फोरकास्टिंग सेंटर (RWFC), नवी दिल्ली नुसार, 30-50 किमी/तास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वेगळ्या भागात वर्तवण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीसह NCR मध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पावसासोबत जोरदार वारे देखील वाहत आहेत. अचानक आलेल्या पाऊस आणि वादळामुळे दिल्लीचे वातावरणही आल्हाददायक झाले आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेती पिकांना देखील फटका बसला आहे. रस्ते वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर काही जणांच्या मृत्यू देखील झाला आहे.

दिल्लीत पावसाने मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे यमुनेच्या पाणीपातळीत वाढ झालेली पहायला मिळत आहे. तसेच छोटे मोठे नदी नाले देखील भरून वाहत आहे. शहरातील काही सकळ भागात आता पाणी साचायला सुरुवात देखील झाली आहे.