Lawrence Bishnoi (फोटो सौजन्य - X/@sumitjaiswal02)

Lawrence Bishnoi Gang: दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या (Lawrence Bishnoi Gang) सात शूटर्सना अटक केली आहे. सर्व शूटर्सना पंजाब आणि आसपासच्या राज्यांतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. बाबा सिद्दीकी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शूटर्सचीही विशेष सेल चौकशी करत आहे.

देशभरातील लॉरेन्स बिश्नोई टोळीवर दिल्ली पोलिसांचे छापे -

प्राप्त माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल देशभरातील लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुन्हेगारांच्या ठिकठिकाणी छापे टाकत आहे. या पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सात शूटर्सला अटक करण्यात आली. सध्या पोलीस या आरोपींची चौकशी करत आहेत. (हेही वाचा -NIA च्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये Lawrence Bishnoi चा भाऊ Anmol Bishnoi; माहिती देणार्‍याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर)

लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षीस -

दरम्यान, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) शुक्रवारी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 2022 मध्ये एनआयएच्या दोन गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांनी उघड केले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या करणाऱ्या तीन संशयित शूटर्सने हत्येपूर्वी एका मेसेजिंग ॲपद्वारे तुरुंगात असलेल्या कॅनडास्थित गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्याशी संवाद साधला होता. (Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा लेक Zeeshan Siddique देखील हिटलिस्टवर? आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडला फोटो .)

बाबा सिद्दीकी यांची हत्या -

12 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले होते. याप्रकरणी बुधवारी मुंबई पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली होती. रुपेश राजेंद्र मोहोळ (22), करण राहुल साळवे (19) आणि शिवम अरविंद कोहर (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे.